- Advertisement -

विरोधकांनो वारं नाय, तर  अख्खं गावचं फिरलयं तुमच्याविरोधात – दत्ताभाऊ कोल्हे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । लक्ष्मीदर्शन आणि जेवणावळीच्या भरवश्यावर निवडणूका जिंकू शकतो,असा विरोधकांचा समज आहे, परंतू जवळ्यातील मतदार नेहमी सर्वसामान्य नेतृत्वासोबत राहिलेला आहे. सोशल मिडीयावर वारं फिरलयं, वातावरण फिरलयं अश्या पोस्ट फिरत आहेत, मात्र वारं फिरलं नसून अख्खं गावचं तुमच्या विरोधात फिरलं आहे, हे विरोधकांनी ध्यानात घावं अशी खोचक टीका शेतकरी विकास आघाडीचे पॅनलप्रमुख दत्ताभाऊ कोल्हे यांनी केली.

जवळा सोसायटी निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी शेतकरी विकास आघाडीचे पॅनलप्रमुख दत्ताभाऊ कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

यावेळी पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, आम्ही तुम्हाला घडवलं आणि आता तुम्हाला नेता व्हायचं स्वप्न पडू लागलेत, तुम्ही सोसायटीचे सभासद तरी आहात का ?  सोशल मिडीयाच्या माध्यमांतून दिशाभूल करून जनाधार मिळत नसतो अशी खरमरीत टीका करत सोशल मीडियावरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या दिशाभूलीला न भुलता सभासदांनी जागरूक रहाण्याचे अवाहन कोल्हे यांनी यावेळी केले.

दरम्यान जवळा सोसायटीवर शेतकरी विकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहे, विरोधकांनी कितीही भूलथापा दिल्या तरी जनता त्याला बळी पडणार नाहीत, सुज्ञ मतदार शेतकरी विकास आघाडी सोबत आहेत, आम्ही सोसायटीच्या माध्यमांतून काम केलं आहे,विरोधकांनी सभासदांसाठी आजवर काय केलयं ? असा सवाल उपस्थित करत कोल्हे पुढे म्हणाले की, जनतेचा गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यावर विश्वास आहे, तोच विश्वास यंदाच्या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित होणार आहे असे कोल्हे म्हणाले.