जे आमचे नाही होऊ शकले, ते तुमचे काय होणार  – राहूल पाटील

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आमच्या दोन पिढ्या तुमच्याबरोबरच राजकारणात गेल्यात, आम्ही तुम्हाला सातत्याने साथ दिली, मात्र जेव्हा आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलो, तेव्हा आमच्या सोबत राहून तुम्ही विरोधकांची भूमिका निभावली, आम्ही तुमचेच होतो ना ? मग आम्हाला दगा का दिला ? दोन पिढ्या तुमच्या तुमच्या सोबत राहून तुम्ही आमचे नाही झालात, मग जनतेचे कधी होणार ? असा रोकडा सवाल विचारत शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी माजी चेअरमन शहाजी पाटील यांच्यावर तोफ डागली.

जवळा सोसायटी निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेतकरी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार राहुल पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले की, गेली 40 वर्षे सोसायटी तुमच्या ताब्यात होती मग गावातील बहुसंख्य शेतकरी सोसायटीचे सभासद होण्यापासून वंचित का राहिले? तसेच दहा वर्षे सरपंच होतात त्या काळात गावचा काय विकास केला हेही विरोधकांनी जनतेला सांगितले पाहिजे.

राहूल पाटील पुढे म्हणाले की, सोसायटी निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले खरे पण संस्थेचे चेअरमन ज्यांना व्हायचे आहे त्यांनी आपल्या सत्ताकाळात गावाचा आणि संस्थेचा काय विकास केला ? याचा हिशोब द्यायला हवा होतो परंतू ते व्यक्तीगत टीका करण्यात धन्यता मानत आहेत.

पाटील पुढे म्हणाले की, पाहुणे रावळ्यांना दाखवण्यासाठी यांना चेअरमन व्हायचयं आहे, पद असल्या शिवाय हे निवडणुकीला उभा राहत नाहीत, त्यांनी जितकी वर्षे सत्ता भोगली तितक्या वर्षांत गाव विकासाच्या नव्या उंचीवर असायला हवं होतं परंतू त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नसल्याने गाव विकासापासून वंचित राहिल.

पाटील पुढे म्हणाले, विरोधकांनी सोसायटीत सत्ता भोगली परंतू कर्ज वाटप करताना गोर गरिब शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नव्हते, मात्र जवळच्याच लोकांना कर्ज दिले जायचे, सभासद वाढवण्यात ते अपयशी ठरले नआहे, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.जनता यांच्या कारभाराला आणि दडपशाहीला पुरती वैतागली असल्याने यंदा सोसायटीत परिवर्तन अटळ आहे असे राहूल पाटील म्हणाले.