जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप, आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यात रविवार रात्री मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. जामखेड तालुक्यात अचानक राजकीय भूकंप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय भुकंपामुळे राष्ट्रवादीला मात्र मोठे खिंडार पडले आहे.
जामखेड तालुक्यात रविवार रात्री आलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू राजुरी हे गाव ठरले. राजुरीला राष्ट्रवादीचा मजबुुत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र या बालेकिल्ल्याला रविवारी मोठे भगदाड पडले. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ अशी ओळख असलेल्या माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांनी आपल्या 200 समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. यामुळे जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.भाजपात प्रवेश केलेले सर्व जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले. त्यानंतर आमदार राम शिंदे यांनी राजुरीकरांशी सविस्तर संवाद साधला.
ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द यावेळी आमदार राम शिंदे यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुरीत झालेला राजकीय भूकंप तालुक्यात चर्चेत आला आहे.
यांनी केला भाजपात जाहीर प्रवेश
रविवारी रात्री चोंडीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात राजुरीचे माजी सरपंच सुभाष काळदाते, राष्ट्रवादीचे युवा नेते संभाजी कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य नाना काळदाते, साहेबराव काळदाते, शिवदास कोल्हे, माजी उपसरपंच सुरेश खाडे, सोसायटी संचालक बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल काळदाते, जयराम काळदाते, रमेश काळदाते, रघुनाथ फुंदे, विक्रम काळदाते, राहुल खाडे, अक्षय काळदाते, आप्पा राऊत, गणेश काळदाते, पप्पू गायकवाड, अशोक काळदाते, सागर फुंदे, राहुल पुलावळे,राम काळदाते,राजु पवार, गोकुळ अवताडे, गोटू लटपटे, नितीन मोरे, सागर काळदाते, किरण घुले, वैजीनाथ डोळे, भरत डोळे, नासीर शेख, अक्षय सपकाळ, सोनू साळवे, विशाल शिंदे, राहूल काळदाते, गणेश काळदाते, आमित राऊत, सुधीर राऊत, अजय कोल्हे, विकास कोल्हे, लाला काळदाते, अनिरुद्ध सपकाळ, आबा सदाफुले, किशोर सदाफुले, सुधीर सदाफुले, साईनाथ मोरे, अविनाश रेडे, गणेश औताडे, शंकेश्वर कोल्हे, रघुनाथ काळदाते, अनिकेत काळदाते, अभिजित काळदाते, राम काळदाते, पोपट लटपटे, प्रदिप लटपटे, समाधान गायकवाड, शंकर डोळे, दादा खाडे, महेश खाडे, सर्जेराव घुले, रवि काळदाते, रमेश खाडे, किरण घुले, राजू मोरे, अंकुश खाडे, सुदाम जाधव, बाप्पू मोरे, विक्रम काळदाते, शहाजी पिसाळ, गणेश कोल्हे, महादेव गिरी, बापूसाहेब काळदाते, अशोक कोल्हे, आप्पा चव्हाण, सागर चव्हाण, विशाल चव्हाण, जयराम काळदाते, सुधीर कोल्हे, श्रीराम काळदाते, युवराज काळदाते, अक्षय सपकाळ सह आदींनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.