- Advertisement -

बापुराव ढवळेंचा करिष्मा कायम; पिंपरखेडवर भाजपचाच कब्जा ! (Bapurao Dhawale’s magic remains on Pimparkhed; Captured the Gram Panchayat for the third time by beating the opposition)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी बापुराव ढवळे यांचा करिष्मा कायम राहिला. बापुराव ढवळे यांच्या ताब्यातून ग्रामपंचायतची सत्ता हिसकावण्यासाठी सरसावलेल्या विरोधकांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न बुधवारी धुळीस मिळाले. भाजपा नेते बापुराव ढवळे यांच्या गटाने सलग तिसर्यांदा ग्रामपंचायतवर एकतर्फी कब्जा मिळवला. सरपंचपदी कांचन ढवळे तर उपसरपंचपदी अविनाश गायकवाड यांची निवड झाली आहे. (Bapurao Dhawale’s magic remains on Pimparkhed; Captured the Gram Panchayat for the third time by beating the opposition)

पिंपरखेड ग्रामपंचायतमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपा नेते बापुराव ढवळे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ दिसत आहेत ( छाया – सत्तार शेख)

पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बापुराव ढवळे यांच्या पॅनलला धोबीपछाड द्यायचाच या इराद्याने यंदा येथील निवडणुकीत तिरंगी सामना रंगला होता. येथील लढत तालुक्यात सर्वाधिक गाजली. तिरंगी लढतीमुळे सत्ताधारी बापुराव ढवळे यांच्या गटाला काठावरचे बहुमत मिळाले होते.तर विरोधकांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले होते.  निकाल लागताच बापुराव ढवळे यांनी आपल्या गटाच्या सहा सदस्यांना सोबत घेत सहलीवर रवाना झाले होते. सदस्य फोडोफोडीसाठी विरोधकांनी लाखोंची आमिषे दिली परंतू सहा सदस्य एकजुटीने सोबत राहिले. विरोधकांनी सदस्य फोडाफोडीसाठी साम दाम दंड भेद या सर्व नितीचा अवलंब केला. सत्तेसाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले परंतू त्यांना अपेक्षित संख्याबळ गाठता आले नाही.

बुधवारी सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सरपंचपदासाठी कांचन बापुराव ढवळे यांच्या विरोधात स्वाती विशाल गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपसरपंचपदासाठी अविनाश गायकवाड यांच्याविरोधात सुशिला ओमासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष सरपंच व उपसरपंच निवडीच्या सभेत विरोधी गटाने गुप्त मतदानाची मागणी केली. गुप्त मतदान होणार असल्याने जनतेत राजकीय चमत्कार होणार अशी चर्चा रंगली होती. निवड प्रक्रिया लांबल्याने दोन्हीकडील समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. (Bapurao Dhawale’s magic remains on Pimparkhed; Captured the Gram Panchayat for the third time by beating the opposition)

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त

तत्पूर्वी बुधवारी सकाळपासुन पिंपरखेडचे राजकीय वातावरण तापले होते. सदस्य पळवापळवीची शक्यता निर्माण झाली होती. पिंपरखेडमध्ये राजकीय महाभारत घडणार असे चित्र होते. मात्र पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व त्यांच्या टिमने सकाळपासुन पिंपरखेडमध्ये तळ ठोकला होता. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी कुठलाही वाद विवाद होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवल्याने येथीर निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून लोंढे यांनी काम पाहिले.

दरम्यान  कुठलाही राजकीय चमत्कार न घडता अपेक्षेप्रमाणे पिंपरखेडमध्ये सरपंचपदी कांचन बापुराव ढवळे यांची तर उपसरपंचपदी अविनाश गायकवाड यांची निवड झाली. त्यांनी विरोधकांवर सहा विरूध्द पाच अशी मात करत ग्रामपंचायतवर कब्जा मिळवला. कांचन ढवळे ह्या सलग दुसर्यांदा पिंपरखेडच्या सरपंच झाल्या आहेत. दरम्यान निकालानंतर बापुराव ढवळे समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.