जवळक्यात भाजपचा गड ढासळला : महाविकास आघाडीने केला ग्रामपंचायतवर कब्जा (BJP’s fort collapses nearby: Mahavikas Aghadi captures Gram Panchayat)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील जवळक्यात यंदा भाजपच्या मजबुत बालेकिल्ल्याला भगदाड पाडत महाविकास आघाडीने ग्रामपंचायतवर कब्जा केला. ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा सुभाष माने तर उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना संतोष वाळुजंकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी गावात एकच जल्लोष केला. निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पुर्ण करण्याचे वचन यावेळी पॅनेलप्रमुख सुभाष माने व संतोष वाळुजंकर पाटील यांनी दिले. (BJP’s fort collapses nearby: Mahavikas Aghadi captures Gram Panchayat)

जामखेड तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतची निवडणुक यंदा भलतीच चुरशीची झाली होती. जनतेने महाविकास आघाडीला स्पष्ट बहूमत दिले. या निवडणुकीत विरोधकांना अवघ्या दोन जागी विजय मिळवता आला. जवळके ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक पाच जागा जिंकत भाजपचा गड उध्वस्त केला होता.जनतेने गावची सत्ता महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याने महाविकास आघाडीने सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

10 फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूकीत सरपंचपदी राष्ट्रवादीच्या उषा सुभाष माने यांची तर उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना संतोष वाळूंजकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संगीता दळवी ऋषीकेश बोराडे,लक्ष्मण साठे, कुंतीबाई वाळूंजकर, सुमित्रा माने हे सदस्य यावेळी उपस्थित होते..सरपंच व उपसरपंच निवडी जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी पॅनल प्रमुख सुभाष माने म्हणाले निवडणूक काळात जनतेला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार आहोत.विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे अपूर्ण कामाचा आजपासुन शुभारंभ करत आहोत. राष्ट्रवादी नेते प्रा. सचिन गायवळ सर यांनी यंदाच्या निवडणूकीत अम्हाला मोलाचे सहकार्य केले.

यावेळी विठ्ठल रूक्मिणी मंदीराच्या कामाचा शुभारंभ हभप वसंत महाराज वाळूंजकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी दगडू वाळूंजकर यांनी १०० गोणी सिमेंट व मेजर रामचंद्र वाळूंजकर यांनी ५० गोणी सिमेंट देण्याचे जाहीर केले तसेच ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश बोराडे यांनी विठ्ठल रूक्मिणी मूर्ती देण्याचे जाहीर केले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (BJP’s fort collapses nearby: Mahavikas Aghadi captures Gram Panchayat)