जामखेड | तालुक्यात गुरूवारी आढळले ४४ नवे कोरोनाबाधित

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने चढ उतार सुरू आहे. अचानक होत चाललेली रूग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. गुरूवारी दिवसभरात ४४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

गुरूवारी दिवसभरात जामखेड तालुका आरोग्य विभागाने ६३३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४६८ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले.

गुरूवारी दिवसभरात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जवळा ०८, जामखेड ०१ , रत्नापुर ०२, फक्राबाद ०३, धोत्री ०१, जवळके ०१, हापटवाडी ०१ असे १७ नवे रूग्ण आढळून आले.

तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR अहवालात जामखेड  तालुक्यातील भोगलवाडी ०३, जामखेड शहर ०५, पिंपळगाव उंडा ०२, फक्राबाद ०३,  नान्नज ०१, पाटोदा ०२, रत्नापुर ०१, वाघा ०१, धोत्री ०२, नानेवाडी ०१, सारोळा ०२, साकत ०१, तेलंगशी ०१, बांधखडक ०१ असे २७ तर इतर तालुक्यातील ०४ असे ३१ रूग्ण आढळून आले.

दरम्यान गुरूवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण ४४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आरोग्य विभागाने ४६८ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली.