जामखेडच्या उद्या भरणाऱ्या आठवडे बाजाराविषयी प्रशासनाने घेतला “हा” निर्णय! (The administration has taken “this” decision regarding Jamkhed’s market tomorrow)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक थोपवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 29 मार्चपासुन ते 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले खरे परंतु जामखेड शहराचा आठवडे बाजार उद्या 27 रोजी असल्याने तो सुरू राहणार की बंद राहणार याबाबत तालुक्यातील जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नगरपरिषद प्रशासन व तहसिल प्रशासनाने हा संभ्रम दुर करत उद्या शनिवारी भरणारा जामखेडचा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे घोषित केले आहे. (The administration has taken “this” decision regarding Jamkhed’s market tomorrow.)
जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यापार्श्वभुमीवर आता प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जामखेड शहराचा आठवडेबाजार 27 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. तालुक्यातील सर्व आठवडे बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 15 एप्रिल पर्यंत बंद राहतील अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. (The administration has taken “this” decision regarding Jamkhed’s market tomorrow.)