Fashion Street fire 2021 : पुण्यातील प्रसिध्द फॅशन स्ट्रिटला लागली भीषण आग ; लाखोंचे नुकसान (Pune city)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या (M G road Pune) फॅशन स्ट्रीटला (Fashion Street fire 2021) शुक्रवारी रात्री अचानक मोठी आग लागली. संपुर्ण मार्केटला आग लागली असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचणी येत होती. कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रय़त्न सुरु होते.

(The entire market was on fire, making it difficult to control the blaze. Vehicles of Cantonment Fire Station and Pune Municipal Corporation Fire Department rushed to the spot and efforts were on to control the fire till late at night.)

आगीची तीव्रता मोठी असून, या दुर्घटनेत मार्केटचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंधरा दिवसांत  ही आगीची दुसरी मोठी घटना आहे.यापुर्वी शिवाजी मार्केटमधील मासळीबाजार जळून खाक झाला होता. त्यातच आता फॅशन स्ट्रीटला आग (Fashion Street fire 2021 ) लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

( The fire was intense and the market was badly damaged in the accident. This is the second major fire incident in the last fortnight in Pune city. Earlier, the fish market in Shivaji Market was gutted by fire. In addition, the fire that broke out on Fashion Street on Friday has caused a great stir.)

Fashion Street fire

बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची (Fashion Street fire) पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे त्यात जिवित हानी झाली की, नाही याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

(few months ago, the board chairman inspected Fashion Street and instructed a new fire audit, senior board officials said. Work to get the fire under control began late night. It was not immediately clear if there were any casualties. However, it is suspected that a large financial loss has been incurred.)