Big News : सहा केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे :महाराष्ट्रातून दानवे व धोत्रे आऊट ? (Six Union Ministers resign: Danve and Dhotre dropped from Maharashtra)

महाराष्ट्रातून संधी कुणाला ?

नवी दिल्ली : केंद्रित मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारापुर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक,कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी या चौघांसह महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे व संजय धोत्रे या दोन केंद्रीय मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आले आहेत. (Six Union Ministers resign: Danve and Dhotre dropped from Maharashtra)

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज सायंकाळी पार पडणार आहे. त्याआधी दिल्लीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. यामध्ये केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि देबाश्री चौधरी यांनी राजीनामा देण्यास सांगण्यात आले त्यानुसार चौघा मंत्र्यांनी आपले राजीनामे मोदींकडे सोपवले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रीमंडळात असलेल्या रावसाहेब दानवे व संजय धोत्रे या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दोन्ही खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याने दोघांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान आज सायंकाळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात महाराष्ट्रातून चार जणांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, हिना गावीत, डाॅ भारती पवार, डाॅ प्रतिम मुंडे यांची नावे मंत्रीपदासाठी स्पर्धेत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.