Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | शेख सलीम अजिमोद्दीन यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी प्रदान
‘हिंदू व मुस्लिम समाजातील घटस्फोटित महिलांची आर्थिक, सामाजिक स्थिती व समस्यांचा तुलनात्मक अभ्यास संदर्भ : बीड जिल्हा’
अंबाजोगाई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) शेख सलीम अजिमोद्दीन यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांनी ‘हिंदू व मुस्लिम समाजातील घटस्फोटित महिलांची आर्थिक, सामाजिक स्थिती व समस्यांचा तुलनात्मक अभ्यास संदर्भ : बीड जिल्हा’ या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला.
१८ जून २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने व्हायवा झाला होता. त्यात एक्स्टर्नल रेफरी म्हणून अंमळनेरच्या नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचे (Nehru Social Work College Amalner) डॉ. प्रा. ए. एस. पाटील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) समाजशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. एल. एच. साळोक यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
उपरोक्त विषयातील पीएचडीच्या संशोधन कार्यासाठी शेख सलीम यांना अंबाजोगाईच्या मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालयात (Manavlok Social Sciences College, Ambajogai) सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. अरुंधती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) २९ जूलै २०२१ रोजी एका परिपत्रकातून शेख सलीम अजिमोद्दीन यांना पीएचडी प्रदान Awarded PhD to Sheikh Salim Azimuddin केल्याची घोषणा केली. शेख सलीम यांनी संबंधित सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी मराठी मासिकात विपुल वैचारिक लेखन केले आहे शिवाय विविध चर्चासत्र व परिषदांमध्ये संबंधित विषयात वेळोवेळी शोधनिबंध व लेख प्रकाशित केले आहेत.
या संशोधन कार्यास मानवलोक (Manavlok Ambajogai) संस्थेतील प्राध्यापक मानवलोक संशोधन केंद्रातील कर्मचारी (Manavlok Research Center Ambajogai), साहित्य निकेतन ग्रंथालय, नगर परिषद ग्रंथालयाचे सहकार्य झाले. शिवाय बीड जिल्ह्यातील आणि अंबाजोगाई सत्र न्यायालयातील वकिल व न्यायाधिश यांचेदेखील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले.