कोर्टाच्या सुनावणीपुर्वी शिंदे गटाचा नवा डाव, शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीआधी शिवसेना खासदारांचा वेगळा गट स्थापन होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिंदे गटानं शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करुन नवी कार्यकारिणी घोषित केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातून काढून घेण्याची पूर्ण तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचेच हे संकेत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षाचा नवा अध्याय पुन्हा तापणार आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाची आज बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत पक्षप्रमुखपद वगळता इतर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अनेक महत्वाच्या पदांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार आले. शिंदे मुख्यमंत्री झाले. आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाने ठोकला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा सामना सुरु झालाय. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटाने वेगवेगळ्या याचिका दाखल केल्यात त्यावर 20 जूलै 2022 ला खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्याआधी मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु आहेत.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्याआधी शिवसेनेतील बंडखोरांच्या हकालपट्टीचा धडाका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला आहे. पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्ता केल्या जात आहे. शिवसेनेने राज्यातील कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची मोहिम सुरु केली आहे. तर शिंदे गटाने कार्यकर्त्यांकडून समर्थनपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. एकुणच या गोष्टी पक्षातील कार्यकर्त्यांचा सर्वाधिक पाठिंबा कोणाला यासाठीच या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

दरम्यान शिंदे गटाने घेतलेल्या आजच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. हा निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे गटाने जाहीर केलेली राष्ट्रीय कार्यकारणी

मुख्य नेता

एकनाथ शिंदे 

मुख्य प्रवक्ता

दिपक केसरकर

नेते

रामदास कदम
आनंदराव अडसूळ 

उपनेते

गुलाबराव पाटील 
उदय सामंत 
तानाजी सावंत 
शिवाजीराव आढळराव
यशवंत जाधव 
शरद पोंक्षे
विजय नाहटा