(Pankaja mundhe) पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा :पंकजा मुंडेंचा सुचक इशारा अन समर्थकांना आदेश

नाराज समर्थकांचे राजीनामे नामंजूर

मुंबई: जोपर्यंत मला शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार आहेत असे सांगत पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा (I remember what the party gave, you remember what was not given) असा आदेश देत तुम्ही दु:खी चेहऱ्याने आलात आहात ते माझ्या पदरात टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू घेऊन तुम्ही माघारी जा, असे भावनिक आवाहन भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Mundhe) यांनी आपल्या समर्थकांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरातील शेकडो मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नाराज मुंडे समर्थकांनी आज पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांची मुंबईतील वरळी येथील कार्यालयात भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी पंकजा यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना वरिल वक्तव्य केले.

यावेळी पंकजाताई (Pankaja Mundhe) पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत. मार्गदर्शाची वाट पाहत आहेत. मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना न्याय देण्याचे काम केले. तळागाळातील माणूस ग्रामपंचायत सदस्य ते आमदार,खासदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. मुंडे साहेबांनी फक्त परळीची आमदारकी मिळवावी म्हणून राजकारणात आणले नाही. त्यांनी लढा दिलेल्या प्रस्थापितांविरोधात उभे करण्यासाठी मला राजकारणात आणले. मुंडे साहेबांनी मुलीला मंत्री करा, संत्री करा, या नातेवाईकाला करा, असे कधी म्हटले नाही.

पुढे बोलताना पंकजाताई (Pankaja Mundhe) म्हणाल्या पक्षसंघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. मला कोणी झापले नाही. मोदींनी अत्यंत सन्मानाची वागणूक दिली. वेळ दिला चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तयाचबरोबर राज्यातील राजकारणाबाबत पंकजा यांनी कोणाचेही नाव न घेता टोले लगावले. यासाठी त्यांनी महाभारतील उदाहरणे दिली. कौरवांसोबत रथी महारथी होते, परंतू ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत होते. मनाने ते पांडवांसोबत होते. तसेच आहे, माझा नेता नरेंद्र  मोदी, माझा नेता अमित शाह आणि जे. पी. नड्डा आहे असे सांगत पंकजा यांनी एकप्रकारे राज्यातील नेत्यांना इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांनी आपली भूमिका मांडली कि, पक्ष संघटनेची चर्चा असल्याने त्याची कुठेही वाच्यता करायची नाही असा नियम असल्याने मी त्यावर बोलणार नाही. मंत्रिपदाची मागणी केली नाही, त्यामुळे दिल्लीत मला त्यावर बोलावे लागले नाही. फक्त जे पी नड्डांच्या कानावर कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांची गोष्ट घातली. त्यांनी सांभाळून घेण्य़ास सांगितले, असे पंकजा म्हणाल्या.

धर्मयुद्धाबाबतही पंकजांनी (Pankaja Mundhe) भाष्य केले. जेव्हा एखादा व्यक्ती राज्यभर प्रवास करून एक संघटना उभी करतो. त्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद होतो. आपल्या विचारांशी असलेला संघर्ष होतो. लोकांची जोडलेली मोट सुटू नये यासाठी लढावे लागतेय, असे पंकजा यांनी म्हटले.पक्षात राम राहिला नाही, तेव्हा बघू या वक्तव्यावर पंकजा यांना विचारले असता पंकजा यांनी हसत तशी वेळ येवू नये असे म्हणत उत्तर देणे टाळले.

प्रीतम मुंडेंची मंत्रीपदाची कुवत असताना त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.आज भागवत कराड (Bhagvat Karad) यांचे वय ६५, माझे ४२. मग माझ्या समाजाचा अपमान मी कसा करू, असे देखील त्या म्हणाल्या.भागवत कराडांना (Bhagvat Karad) मंत्रिपद दिल्याने नाराज नाही. त्यांच्या शपथविधीलाही गेले असते, परंतू दुर्दैवाने मला हे उशिरा समजले, यामुळे कार्यकर्तेही नाराज झाले, असे पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. (Why Pankaja Munde not went to Bhagvat Karad’s minister oath?)

नाराज समर्थकांचे राजीनामे नामंजूर – Pankaja Mundhe

माझे भांडण नियतीशी आहे, मुंडे साहेबांना दिलेली सत्ता या नियतीने खेचून घेतली. ती सत्ता खेचून आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे मी म्हणाले होते. मुंडे साहेबांचे स्वप्न होते, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, ते स्वप्न पूर्ण करावे म्हणून मी संघर्ष यात्रा काढली होती. राज्यातल्या नेत्यांनी केंद्रात प्रस्ताव पाठवला होता. पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या, मी नाकारले, असे पंकजा म्हणाल्या. मग मी तुम्हाला राजीनामे द्यायला लावेन का, असा सवाल करत मी तुम्ही दिलेले राजीनामे नामंजूर करत आहे, अशी घोषणा पंकजा (Pankaja Mundhe) यांनी केली.