तर रवी सुरवसेंना ओबीसी समाज जागा दाखवणार ; राष्ट्रवादीच्या तुळशीदास गोपाळघरे यांचा थेट इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपच्या रवी सुरवसे यांना अगामी निवडणूकीत ओबीसी समाज जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी ग्रंथालय सेल चे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

याबाबत माहिती अशी की, खर्डा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.त्यामुळे ओबीसी समाजातील असंख्य कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते त्यातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद सुरवसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे जाहीर झालेले ओबीसी आरक्षण रद्द करावे अशी लेखी मागणी त्यांनी केली आहे.त्यामुळे खर्डा जिल्हा परिषद गटातील ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तुळशीदास गोपाळघरे पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी फक्त निवडणुकीच्या मतदाना पुरते ओबीसी समाजाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.खर्डा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बदलले तर त्याला भाजपचे रवी सुरवसे हे जबाबदार राहणार आहेत पुढील काळात रवी सुरवसे जर कोणत्याही निवडणुकीला उभे राहिले तर ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे थेेट इशारा गोपाळघरे यांनी दिला आहे.