जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामखेडच्या वतीने आज जामखेड शहरात भव्य दिव्य १११ फूटी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
तिरंगा पदयात्रेची सुरवात जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड येथून झाली होती. जामखेडकरांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले.अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या यात्रेची सांगता जामखेड महाविदयालयाच्या परिसरात झाली.
यावेळी अभाविप दक्षिण नगर जिल्हा संयोजक अथर्व पाडळे, अभाविप नगर विभाग संघटनमंत्री ओंकार मगदूम दक्षिण नगर जिल्हा संघटनमंत्री चेतन पाटील, विवेक कुलकर्णी, शिवनेरी ॲकडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे,ऋषिकेश मोरे, तसेच अविराज डुचे, प्रथमेश कोकणे, कुणाल खटके, जय देशपांडे, ऋषिकेश ठांगील,ओम मोरे,कृष्णा बुरांडे, निखिल आवारे, सुरज निमोणकर, साहिल भंडारी,शुभम धनवडे, प्रसाद होशींग, गणेश पवार,निखिल अवरे, लहू राऊत, योगेश हुलगुंडे,गौरव समुद्र ,आश्विन राळेभात, अभिनव कटारिया,सौरभ पवार सह आदी सहभागी झाले होते.