Khadse’s CD : महाराष्ट्राला प्रतिक्षा खडसेंच्या सीडीची – Raj Thackeray

काँग्रेसने जे केले तेच भाजप करतयं

पुणे : महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी तेच केले होते आणि आता भाजपही काँग्रेसचा कित्ता गिरवत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. (I am waiting for Khadse’s CD – Raj Thackeray)

राज ठाकरे आजपासुन दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना 'ईडी'च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर अप्रत्यक्ष तोफ डागली आहे.(I am waiting for Khadse's CD - Raj Thackeray)

यावेळी पुढे माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्यामागे 'ईडी' लावली तर मी सीडी बाहेर काढेन अशी दर्पोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत दाखल होताना केली होती. त्यामुळे मी एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात याचीच वाट पाहत आहे असे सांगत ईडीकडून राज्यात सुरू असलेल्या कारवाईवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. तर खडसेंनी सीडी बाहेर काढावे असा सुचक इशाराच ठाकरे यांनी दिला आहे.(I am waiting for Khadse's CD - Raj Thackeray)

पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. आज आणि उद्या ते पुण्यात मुक्कामी आहेत. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. महापालिका निवडणुकीची रणनिती यात ठरणार आहे.(I am waiting for Khadse’s CD – Raj Thackeray)

काय आहे खडसे प्रकरण ?

पुण्याजवळील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील सर्व्हे क्र. ५२ हिस्सा २ अ/२ या मिळकतीवरील २१ आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी (रा. कोलकता) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सौफुद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम फक्रुद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, साकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला व इतर वाटेकरी आहेत. सुमारे ४० वर्षांपूर्वी उकानी यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली. ती परत मिळावी, म्हणून उकानी यांनी आठ सप्टेंबर २०१५ मध्ये हायकोर्टात याचिका केली. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर उकानी यांनी एमआयडीसीला न कळविताच ही जमीन खडसे कुटुंबीयांना विकली होती. हे जमीन खरेदी विक्री प्रकरण माजी मंत्री एकनाथ खडसे यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणावरून त्यांना फडणवीस सरकारमधून मंत्रीपदावर पाणी सोडवा लागले होते.त्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या या प्रकरणात खडसे यांचे जावाई अटकेत आहेत. तर ईडीने खडसे पती पत्नी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. खडसे यांची चौकशीही झाली आहे.