माजी मंत्री राम शिंदेंच्या मोबाईलमध्ये दडलयं काय ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। खासदार सुजय विखे पाटील मंगळवारी जामखेड तालुका दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात त्यांच्या समवेत माजी मंत्री राम शिंदेही उपस्थित होते. विखे यांनी जामखेड दौर्‍यात जोरदार फटकेबाजी केली.

या फटकेबाजीचा रोख अर्थातच आमदार रोहित पवार यांच्यावर होता. पवारांना टार्गेट करण्याची कुठलीच कसर विखेंनी सोडली नाही. दुसरीकडे राम शिंदे यांचे कौतुक करत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत – जामखेडमध्ये विकास होत असल्याचेही विखे यांनी स्पष्ट केले.

सुजय विखे व राम शिंदे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हळगावमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी मंत्री राम शिंदे हे खासदार विखे यांना काही तरी दाखवत होते. याच फोटोची सध्या चर्चा सुरू आहे.

हळगाव येथील कार्यक्रमात राम शिंदे हे खासदार सुजय विखे यांना आपल्या मोबाईलमधून काहीतरी दाखवत होते. बराच वेळ दोन्ही नेते मोबाईल पाहण्यात व्यस्त होते. शिंदे हे आपल्या मोबाईलमधून विखे यांना नेमके काय दाखवत असतील ? शिंदेंच्या मोबाईलमध्ये नेमकी कुणाची कुंडली आहे ? शिंदे यांच्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलयं ? याचीच चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती.

खासदार विखे व माजी मंत्री राम शिंदे या दोन्ही नेत्यांनी जामखेड दौर्‍यावर चौफेर फटकेबाजी केली. दोन्ही नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. एकदिलाने दोन्ही नेते वावरत असल्याचे जामखेड दौर्‍यात दिसून आले. विखेंनी शिंदे यांचे कौतुक करत शिंदे समर्थकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.

केंद्र सरकारकडून राबवल्या जात असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असेही अवाहन विखे यांनी केले.