गणेशविसर्जन मिरवणुकीत आमदार राम शिंदेंचा बोलबाला, शिंदेंच्या ‘त्या’ डान्सची राज्यात चर्चा, रामजी कि निकली सवारी.. रामजी कि लीला है न्यारीने गाजवला दिवस !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। डीजे तालावर नाचणारी तरूणाई.. गणपती बाप्पा मोरयाचा गजर अन अधूनमधून कोसळणारा पाऊस. अश्या मंगलमय वातावरणात कर्जत जामखेड मतदारसंघात शुक्रवारी गणरारायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यात शुक्रवारचा दिवस गाजवला तो आमदार राम शिंदे यांनी.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,

आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड शहर व तालुक्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. जामखेड शहरातील जयहिंद चौकात गणेशभक्तांसमवेत राम शिंदे यांनी भन्नाट डान्स करत मिरवणुकीत जोश भरला. राम शिंदे यांच्या याच डान्सचे व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. शिंदे यांच्यासमवेत भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक लक्ष वेधले ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या डान्सने.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,

जामखेड तालुक्यात यंदाचा गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पडला. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. विसर्जन मिरवणुकीत आमदार राम शिंदे यांच्यावरील गाण्यांवर तरूणाई थिरकताना दिसत होते. शिंदे यांचे जामखेडमधील विसर्जन मिरवणुकीत आगमन होताच रामजी की निकली सवारी…  रामजी की लिला है न्यारी.. हे गाणे डिजेवर वाजताच तरुणाईने एकच जल्लोष केला.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,

यावेळी आमदार राम शिंदे यांना तरूणांनी खांद्यावर घेत नाचण्यास सुरुवात केली. तरूणांचा उत्साह शिगेला पोहचलेला असतानाच शिंदे यांनीही आपल्या खास शैलीत डान्स करत उपस्थितांची मने तर जिंकलीच शिवाय तरूणांमध्ये वेगळाच जोश भरला. राम शिंदे यांच्या खास डान्सने शुक्रवारचा दिवस गाजवला. शिंदे यांच्या डान्सचे व्हिडीओ काही क्षणात सोशल  मीडियावर वायरल झाले. शनिवारी सुध्दा शिंदे यांच्या डान्सच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शिंदे यांच्या व्हिडिओची राज्यात तुफान चर्चा रंगली आहे.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,

आमदार राम शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात शिंदे हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. शिंदे हे मतदारसंघात आक्रमकपणे सक्रीय झाल्याने मतदारसंघातील शिंदे आणि भाजपा समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सामान्य नागरिकांचा लोंढा शिंदेंना भेटताना दिसत आहे. शिंदे हे सुध्दा सर्वांना वेळ देताना दिसत आहेत.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,

गणेशोत्सव काळात आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात दौरा करत विविध गणेश मंडळांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यंदाच्या गणेशोत्सवात राम शिंदे यांचा वेगळाच मुड दिसून आला. शिंदे यांनी विसर्जन मिरवणुकीत केलेला डान्स हा चर्चेत आला आहे. शिंदे हे जनतेत पुन्हा वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहेत. शिंदे जातील तिथे गर्दी होताना दिसत आहे. एकुण मतदारसंघात शिंदेंचा पुन्हा बोलबाला सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

mla Ram Shinde's dominance in Ganesh Visarjan procession, ram Shinde's dance is discussed in the state, Ramji ki nikli sawari Ramji ki lila hai nyari,