पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचे पडसाद कर्जतमध्ये, आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जाळला पाकिस्तानचा ध्वज !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचे पडसाद शनिवारी कर्जतमध्ये उमटले. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने कर्जतमध्ये तीव्र अंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याबरोबरच पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध नोंदवला.

In Karjat aggressive BJP under the leadership of MLA Ram Shinde burnt the flag of Pakistan

G20 च्या अध्यक्षपदी ज्यांची नेमणूक झाली, असे भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी, जी खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि टिप्पणी केली, यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान झालाय, त्यामुळे हा देश आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन करू शकत नाही, म्हणुन तीव्र अंदोलन भाजपच्या वतीने छेडण्यात आले, अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.

कर्जत तालुका भाजपच्या वतीने पाकिस्तानचा निषेध आज करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच देश का नेता कैसा हो.. नरेंद्र मोदी जैसा हो.. भारत माता की जय.. वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली.

In Karjat aggressive BJP under the leadership of MLA Ram Shinde burnt the flag of Pakistan

या अंदोलनात आमदार राम शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष डाॅ सुनील गावडे, अशोक खेडकर, सचिन पोटरे, अंबादास पिसाळ, गणेश क्षीरसागर, राहुल निंभोरे पप्पू शेठ धोदाड, विनोद दळवी सौ.आरती थोरात, सुनील यादव, अनिल गदादे, काका धांडे,आण्णा म्हस्के, शोएब काझी, गणेश जंजिरे, संतोष निंबाळकर, सुनील काळे, भाऊसाहेब गावडे, प्रशांत शिंदे, रोहित ढेरे, उमेश जेवरे, बंटी यादव, शेखर खरमरे सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

In Karjat aggressive BJP under the leadership of MLA Ram Shinde burnt the flag of Pakistan