चंद्रकांत पाटलांचे घुमजाव : राजकीय भूकंपाच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिले ‘हे’ स्पष्टीकरण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्यात खळबळजनक विधानं करायची अन राजकीय चर्चा घडवून आणायची असा पायंडाच जणू पडला आहे. अनेक पक्षातील राजकारणी सध्या आपल्या विधानांवरून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन तीन दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानावरून राज्यात बरीच चर्चा झडली पण आता चंद्रकांत पाटलांनी घुमजाव करत त्या विधानवरून सुरू असलेल्या चर्चेवर रविवारी पडदा टाकला आहे.चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप जोरदार व्हायरल झाली आणि सर्वत्र चर्चांना उधाण आले. चंद्रकांत पाटील हे देहू येथील एका कार्यक्रमात पोहोचले होते त्यावेळी माईकवरुन एकाने माजी मंत्री असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असे पाटलांनी विधान केले होते. मात्र या विधानामुळे तर्क-वितर्काना उधाण आले होते .त्यानंतर आज पुण्यात या संपर्ण प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

पुण्यात गणेश विसर्जनापूर्वी गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या चंद्रकांत पाटीलांना माजी मंत्री म्हणू नका या विधानावर पत्रकारांनी विचारले की, ४८ तासांची मुदत संपली आहे काय बोलाल. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, मी घडलेला प्रसंग सांगतो.

कोविडच्या निमित्ताने नाभिक समाजातील एक तरुण माझ्या संपर्कात आला. त्यावेळी मी त्याला सांगितले होते की चांगले सलून तुला उभे करुन देईन.ते सलून देहू येथे त्याच्या सासरवाडीला उभे राहिले . त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला मी गेलो.

तेथे ग्रामीण भागात असलेल्या माईक सिस्टमवरुन अनाऊसमेंट सुरू होती. माजी मंत्री बाळासाहेब ढवळे यांनी पुढे यावे त्यावेळी मी म्हटले ए माजी काय म्हणतो काही दिवसांनी ते आजी होतील.

यामध्ये मला माजी मंत्री म्हणू नका असा काही विषय नाही. एवढ्या छोट्या गावातही कुणीतरी क्लिप केली आणि फिरवली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात खूप चर्चा झाली. माझा कुठलाही असा हेतू नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

भाजपचा एकही आमदार पक्षांतर करणार नाही 

महाविकास आघाडी करून भाजपचे आमदार फुटणार आहेत, त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे अश्या बातम्या पेरून हवा निर्माण केली जात आहे. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांचे घुमजाव