मुंबई : वृत्तसंस्था | गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा सोन्याचा दर (gold prices) १० हजार रुपयांनी कमी आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याने (Gold Rates) प्रति तोळा ५६,१९१ रुपयांचा स्तर गाठला होता.एक वर्षानंतर सोने ४६ हजार रुपयांवर आले आहे.
गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.डॉलर मजबूत झाला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येत आहे. (Why has gold prices fallen this year compared to last year?)
सोन्याचा दर (gold prices) ५ आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. एमसीएक्स (MCX) सोन्याचा दर ४६ हजारांवर आहे. सोन्याच्या दरात एक दिवसात ३ टक्क्यांने घसरण झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनात सुधारणा दिसून येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या (Gold Rates) दरावर दबाव वाढला असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात (gold price) २० टक्क्यांनी घसरण झाली आहे.सोन्यावर मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला तर सोन्याने एमसीएक्सवर एक आठवड्यात १ टक्के, एका महिन्यात २ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
एका वर्षात सोन्याने ११ टक्के परतावा मिळवून दिला आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात (Gold Rates) घसरण झाली असल्याचे कमोडिटी मार्केटमधील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याच्या दरात (Gold Rates) चढ-उतार सुरुच आहे. भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. यामुळे सोन्याच्या दरावर (gold price) दबाव निर्माण झाला आहे.पुढील काही दिवसांत सोने आणखी स्वस्त होणार असल्याचे संकेत कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांनी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याची प्रति औंस १,६०५ डॉलरपर्यंत खाली येईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) माहितीनुसार, शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी (gold price) २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,३१० रुपये, २३ कॅरेट सोने ४६,१२५ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,४२० रुपये, १८ कॅरेट ३४,७३३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,०९१ रुपये होता.तर चांदी प्रति किलो ६१,१३१ रुपये होती.
भारतीय सराफा बाजारात (Bullion Market india) २४ कॅरेट सोने (24 carat pure gold) सर्वांत शुद्ध सोने समजले जाते.मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात.
२४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (gold price)