Sambhaji Nagar Accident News : हायवाने दुचाकीला चिरडले, परिक्षेला जात असताना झाला भीषण अपघात; तिघा सख्या भावंडांचा मृत्यू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sambhaji Nagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत तिघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. परीक्षेसाठी जात असतानाच हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये तिघा बहिण – भावांचा समावेश आहे. हा अपघात बाळापूर फाट्यावर घडला.

Sambhaji Nagar Accident News, Haiva crushes two wheeler, terrible accident happened while going to exam; Death of three siblings, Pravin Ambhore, Pratibha Ambhore, Lakhan Ambhore,

छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर फाट्यावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या घटनेत प्रविण अंभोरे, प्रतिभा अंभोरे, लखन अंभोरे हे तिघे बहिण भाऊ दुचाकीवरून परीक्षेला जात असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणार्‍या या भीषण अपघाताच्या या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर आज सकाळी (८, फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. या दुर्घटनेत परीक्षेला जाणाऱ्या तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले.बाळापूर फाट्यानजीक दुचाकीला हायवा गाडीने चिरडले. या घटनेत प्रविण अंभोरे, प्रतिभा अंभोरे, लखन अंभोरे या तिघा सख्या भावंडांचा मृत्यू झाला. तिघे भावंड वनविभागाची परीक्षेसाठी दुचाकीवरून निघाले होते. (Pravin Ambhore, Pratibha Ambhore, Lakhan Ambhore)

तिघांकडे वनविभागाच्या परीक्षेचे हाॅल तिकीट आढळून आले आहे. अपघाताच्या घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अंभोरे कुटुंबांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पंचवीशीच्या आतील तिघा भावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातातील मृत भाऊ- बहिण हे परभणी (Parabhani) जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत