whatsapp down | जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत आहेत. व्हॉट्सॲपचं सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. WhatsApp, Facebook Instagram went down; The reason is unclear
जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.
तसेच फेसबुक व इन्स्टाग्राम ही बंद पडल्याची माहिती समोर येत आहे. अचानक फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप हे तिन्ही साईट बंद झाल्याने युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.