trump tariffs india : पिसाळलेल्या अमेरिकेची भारतावर टॅरिफ दादागिरी सुरूच, भारत आणि अमेरिकेत नेमकं काय चाललंय ? सविस्तर वाचा

trump tariffs india : जागतिक व्यापारावर आपलेच ऐकमेव वर्चस्व असावे याकरिता पिसाळलेल्या अमेरिकेने (America) भारतावर (india) दादागिरी करत ५० टक्के बेसलाईन टॅरिफ (आयात शुल्क) लागु केल्याने जागतिक पातळीवर वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ बाँब (tariff bomb) विरोधात आता टीका होऊ लागली आहे. भारतानेही अमेरिकेला चोख उत्तर दिले आहे. (America india tariff war latest news)

trump tariffs india, The crushed America's tariff tyranny on India continues, what is really happening in India and America? Read in detail,

चीनसारखे इतर देशही रशियन तेल (Russian Oil) आयात करत असूनही भारतावर अतिरिक्त कर का लादण्यात आला असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला तेव्हा ट्रम्प यांनी सांगितले की,”आता फक्त ८ तास झाले आहेत. पुढे आणखी काय होते ते पाहत राहा. तुम्हाला बरेच काही पाहायला मिळेल. तुम्हाला अनेक दुय्यम निर्बंध पाहायला मिळतील.”असे म्हणत त्यांनी भारताला एकप्रकारे धमकी दिली आहे. (trump tariffs india news)

trump tariffs india : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले .मोदी म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च क मी करण्यासाठी सतत काम करत आहे. आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही. मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे.

सेमीकंडकटर चिप्सवर १०० टक्के टॅरिफ कर लादण्याची भारताला धमकी

ट्रम्प यांनी रशियन तेलाच्या सतत खरेदीला प्रतिसाद म्हणून त्यांच्या दक्षिण आशियाई व्यापार भागीदारावर २५ टक्के अतिरिक्त कर (us tarif on India) भारतावर लादला होता. त्यानंतर पुन्हा २५ टक्के टॅरिफ कर त्यांनी भारतावर लादला. पहिला २५ टक्के टॅरिफ आजपासून लागु झाला आहे. तर दुसरा टॅरिफ २० दिवसांनी लागु होणार आहे. अश्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडकटर चिप्सवर १०० टक्के टॅरिफ कर लादण्याची भारताला धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे सेमीकंडक्टर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. (trump tariff news)

trump tariffs india impact : भारताकडून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ

भारत आणि रशियामधील मैत्रीमुळे ट्रम्प निराश आहेत. ते भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची सतत धमकी देत आहेत. परंतु भारताने राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. ट्रम्प यांना हे आवडले नाही. म्हणूनच त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे (trump tarifies India). भारताकडून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आकारला जाईल. याचा फटका भारतातील रत्नं आणि दागिने, कापड, चामडं, कोळंबी, रसायनं आणि यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांना बसेल.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, सर्वात मोठा फटका कापड आणि वस्त्र (१०.३ अब्ज डॉलर्स), रत्ने आणि दागिने (१२ अब्ज डॉलर्स), कोळंबी (२.२४ अब्ज डॉलर्स), चामडे आणि पादत्राणे (१.१८ अब्ज डॉलर्स), रसायनं (२.३४ अब्ज डॉलर्स) आणि यंत्रसामग्री (९ अब्ज डॉलर्स) क्षेत्रांना बसेल. या क्षेत्रांमध्ये आधीच खूप स्पर्धा आहे आणि मार्जिन खूप कमी आहे. भारतीय कोळंबीवर आधीच २.४९% अँटी-डंपिंग ड्युटी आणि ५.७७% काउंटरवेलिंग ड्युटी आकारली जाते. आता २५% अतिरिक्त टॅरिफ लादल्यानं एकूण ड्युटी ३३.२६% पर्यंत वाढेल. (trump tariff news india)

५० टक्के टॅरिफचा परिणाम देशातील कपडे, पादत्राणे यांच्या व्यवसायावर होईल. कारण भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या टेक्सटाईलचं प्रमाण मोठं आहे. अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात कपडे, पादत्राणे आयात करतो. २५ टक्क्यांच्या जागी ५० टक्के टॅरिफ लावण्यात आल्यानं अमेरिकन बाजारात या वस्तू महाग होतील. त्यामुळे मागणी घटेल. अमेरिकेकडून होणारी कपड्यांची एकूण आयात पाहता, त्यात १४ टक्के हिस्सा भारताचा आहे. ही उलाढाल ५.९९ अब्ज डॉलरच्या घरात जाते.आता कार्पेटवर ५२.९%, विणलेल्या कपड्यांवर ६३.९%, यंत्रसामग्रीवर ५१.३% शुल्क आकारलं जाईल.

भारताच्या ज्वेलरी आणि हिरे उद्योगाला फटका बसू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा दुसरा फटका भारताच्या ज्वेलरी आणि हिरे उद्योगाला बसू शकतो. भारताकडून जगभरात हिऱ्यांची निर्यात होते. यात अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचा वाटा मोठा आहे. टॅरिफ दुप्पट झाल्याचा परिणाम अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ज्वेलरी आणि हिऱ्यांना बसेल. अमेरिकन बाजारात त्यांचे दर वाढतील. अमेरिका आयात होणाऱ्या एकूण हिऱ्यांपैकी ४४.५ टक्के हिरे भारतातून जातात. हा व्यवसाय तब्बल ६.७ अब्ज डॉलरचा आहे. तर अमेरिकेच्या एकूण दागिने आयातीत भारताचा वाटा १५.६ टक्के असून त्याचं बाजारमूल्य ३.५ अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे आता दागिने आणि हिऱ्यांवर ५२.१% शुल्क आकारला जाईल.

चिप्सवर १०० टक्के टॅरिफ का?

रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर यापूर्वीच अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. आता ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर चिप्सवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा करून बाजारात पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सध्या अनेक देश सेमीकंडक्टर उद्योगात काम करत आहेत. मात्र, भारत या क्षेत्रात वेगाने एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येत आहे. भारत सरकार देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, ट्रम्प यांचा हा निर्णय भारताच्या या प्रयत्नांना धक्का देऊ शकतो.

भारतावर काय परिणाम होईल?

जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिप्सवर १०० टक्के कर लावला, तर त्याचा भारतासह तैवान, जपान आणि चीनवरही खोलवर परिणाम होईल. एका अहवालानुसार, भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ पुढील पाच वर्षांत १०० ते ११० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. गेल्या तीन वर्षांत या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.

२०२२ मध्ये भारताची चिप बाजारपेठ सुमारे २३ अब्ज डॉलर्स होती.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ती ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. या तुलनेत अमेरिकेची चिप बाजारपेठ १३० अब्ज डॉलर्स आणि चीनची १७७.८ अब्ज डॉलर्स होती. भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ वेगाने वाढत असताना, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगावरही परिणाम होऊ शकतो, कारण चिप्स हा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा महत्त्वाचा भाग आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजगारावर होणार आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्याय्य, असमर्थनीय आणि अतार्किक आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल”, असे रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हा निर्णय भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे.” भारताने स्पष्ट केले की त्याची कच्च्या तेलाची आयात बाजारपेठेवर आधारित आहे आणि त्याचा उद्देश १४० कोटी नागरिकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणे आहे. भारताने असेही म्हटले आहे की जगातील अनेक देश त्यांचे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन असेच निर्णय घेत आहेत, म्हणून फक्त भारताला लक्ष्य करणे “अन्यायकारक आणि निराधार” आहे. सरकारने पुन्हा एकदा सांगितले की ते आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.