HMPV virus news 2025: कोरोनानंतर HMPV व्हायरसचा जगाला धोका ? चीनमधून आलेल्या धक्कादायक बातमीने जगाच्या चिंता वाढल्या, जाणून घ्या hMpv व्हायरसची लक्षणे
HMPV virus news : कोरोना महामारीच्या महाभयानक संकटातून जग सावरत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाच वर्षापुर्वी चीनमधून आलेल्या कोरोनाने जगात धुमाकूळ घातला होता. त्याच चीनमध्ये एक रहस्यमयी व्हायरस (Human metapneumovirus) पसरल्याची बातमी समोर येत आहे. चीनमध्ये HMPV नावाचा व्हायरल पसरला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. या बातम्यांमुळे जगावर चिंतेचे ढग घोंघावू लागले आहेत. (hmpv virus news in marathi)

चीनमध्ये लहान मुले व वृध्दांमध्ये श्वसनाच्या आजारामध्ये अचानक वाढ झाली आहे. HMPV व्हायरसमुळे या आजारात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. या व्हायरसची लक्षणे कोरोनासारखी आहेत. सर्दी, फ्लू, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे अशी HMPV व्हायरसची लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणात न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (hmpv virus news in india)
दरम्यान या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटना (WHO) व चीन सरकारने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे तूर्तास घाबरण्याचे कारण नाही. परंतू सोशल मीडियावर या रहस्यमय आजाराबाबत अनेक पोस्ट व बातम्या वेगाने व्हायरल होत असल्याने चीनबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. ज्यामध्ये रुग्णालय रुग्णांनी भरलेली आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याच दिसून येतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड लॉकडाऊन दरम्यान लोकांचा इतर सामान्य व्हायरसची संपर्क कमी झाला, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली.

तज्ञांच्या मते, सध्या इन्फ्लूएंझा ए हा मुख्य रोग आहे आणि hMPV ची काही प्रकरणं नोंदवली गेली आहेत. पण hMPV हा नवीन आजार नाही.
हा आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला आणि आजारी असाल तर घरीच रहा. लहान मुले आणि वृद्ध यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यासंदर्भात कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. चीनमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे, लॉकडाउनच्या अफवा पुन्हा एकदा जगभरात वाढतायत. परंतु तज्ञ म्हणतात की, हा एक सामान्य हंगामी आजार आहे.
चीनी मीडिया आणि आरोग्य तज्ञांच्या मते, यावेळी समस्येचे केंद्र ‘ह्युमन मेटा-न्युमो व्हायरस (एचएमपीव्ही)’ आहे. हा एक विषाणू आहे, ज्यामुळे प्रामुख्याने श्वसनाच्या समस्या उद्भवतात. हा विषाणू मुलांवर आणि वृद्धांना सर्वात जास्त प्रभावित करतो, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. हा विषाणू कोरोनासारखा धोकादायक नसून त्याची लक्षणे आणि वेगाने पसरण्याची क्षमता हा चिंतेचा विषय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे
HMPV व्यतिरिक्त, इतर विषाणू देखील चीनमध्ये पसरत आहेत, त्यापैकी RSV (रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) आणि इन्फ्लुएंझा प्रमुख आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे संसर्गाचे प्रमाण वाढवत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. चीनमध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत असं चित्र दिसून येत आहे. तर यामुळे जगभरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
HMPV virus news : HMPV ची लक्षणे काय आहेत ?
HMPV ची लक्षणे खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास लागणे आणि अशक्तपणा यासारख्या सामान्य सर्दीप्रमाणे सुरू होतात. परंतु यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्याचे उपचार केवळ लक्षणे नियंत्रणाच्या आधारे केले जात आहेत.
चीनमधील अनेक मोठ्या शहरांमधील रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. डॉक्टर आणि परिचारिका २४ तास कार्यरत आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांची संख्या वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एचएमपीव्ही आणि इतर विषाणूंचा प्रभाव सध्या प्रादेशिक स्तरापुरता मर्यादित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, इतर देशांनी यावर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्य सेवा सज्ज ठेवणे गरजेचे आहे. (HMPV virus news)
2001 मध्ये पहिल्यांदा शोध
HMPV चा पहिल्यांदा शोध हा 2001 मध्ये लागला, एका डच शोधकर्त्याने श्वासाशी संबंधित त्रास असणाऱ्या काही मुलांचे सँपल घेतले होते. मात्र हा व्हायरस गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व हंगामात हा व्हायरस असतो मात्र याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्याच्या हंगामात असल्याचे सांगण्यात येते (HMPV virus news)