India won T20 series । टीम इंडियाने रचला इतिहास : न्यूझीलंडला व्हाईटवॉश देऊन भारताने टी-20 मालिका जिंकली

कोलकाता – India won T20 series । कोलकात्यात खेळल्या गेलेल्या T20 series सीरीजच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्य़े टीम इंडियाने (Team India made history) न्यूझीलंडचा (New Zealand) ७३ रन्सनी पराभव केला आहे. या मॅचच्या विजयानंतर ही सीरीज ३-० अशी टीम इंडियाने खिशात घातली आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग निर्णय घेतला, २० ओव्हर्समध्ये टीम इंडियाने सात विकेट्स गमावत १८४ रन्स केल्या होत्या. न्यूझीलंडला विजयासाठी १८५ रन्सचे टार्गेट देण्यात आले होते. रोहित शर्माने सर्वाधिक ५६ रन्स केल्या होत्या. १८५ रन्सचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमने चाहत्यांची निराशा केली. सगळी टीम १७.२ ओव्हरमध्ये १११ रन्सवर बाद झाली. गुप्टिलच्या ५१ रन्स सोडल्यास एकही बॅट्समन चांगली कामगिरी करु शकला नाही. टीम इंडियाच्या अक्षर पटेलने तीन तर हर्षल पटेलने २ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला क्लीन स्विप देऊन रोहितच्या टीमने इतिहास रचला आहे. यापूर्वी भारतीय मैदानावर न्यूझीलंडसोबत असे कधीही झाले नव्हते.

टीम इंडियाने शानदार बॅटिंग केली. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि ईशान किशनने ३८ बॉल्समध्ये ६९ रन्स केले. मात्र त्यानंतर ईशान २९ रन्सवर आऊट झाला. रोहितने २७ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. व्यंकटेश अय्यरने २०, श्रेयस अय्यरने २५, हर्षल पटेलने १८, तर शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक चाहरने २ चौकार आणि एक सिक्सच्या मदतीने १९ रन्स केले.

१८५ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना किवी टीमची सुरुवात चांगली झाली होती. १३ बॉलमध्ये मार्टिन गुप्टिल आणि डेरिल मिचेल यांनी २१ रन्स केले होते. ही पार्टनरशीप अक्षर पटेलने मिचेलला ५ रन्सवर आऊट करुन तोडली. याच ओव्हरमध्ये अक्षरने मार्क चैपमॅनला शून्य रन्सवर बादल केले. अक्षरने घातक गोलंदाजी करत पुढच्या ओव्हरमध्ये ग्लेन फिलिफ्सला शून्य रन्सवर बाद केले. न्यूझीलंडच्या टीमला त्यानंतर मार्टिन गुप्टिलने सावरले. चौथ्या विकेटसाठी गुप्टिल आणि टीम साईफर्ड यांनी ३५ बॉल्समधे केले. ३९ रन्स केल्या. युजवेंद्र चहलने ५१ रन्सवर गुप्टिलला बाद केले. त्यानंतर टीम साईफर्ड १७ रन्सवर रन आऊट झाला. त्यानंतरच्या विकेट्स पटापट गेल्या. आणि १११ रन्सवर पूर्ण टीम तंबूत परतली.