- Advertisement -

नवाब मलिकांनी मध्यरात्री टाकला नवा फोटोबाँम्ब  : समीर वानखेडे म्हणणार कबूल है कबूल है ? 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : नवाब मलिक विरूध्द समीर वानखेडे या वादात रविवारी मध्यरात्री नवाब मलिक यांनी मोठा बाॅम्ब टाकला. नवाब मालिकांच्या मास्टरस्ट्रोकमुळे  एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता नवाब मालिकांनी वानखेडे यांच्या विवाहाचा एक फोटो समोर आणला आहे.

नवाब मलिक यांनी समोर आणलेला हा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून समीर वानखेडे यांचा आहे. यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येत असुन हा फोटो वानखेडे यांच्या लग्नाचा आहे. यात ते एका मौलवी शेजारी बसलेले दिसून येत आहेत. मौलवींच्या हातात एक रजिस्टर असल्याचे फोटोत दिसत आहेत.त्यावर वानखेडे हे सही करताना दिसत आहेत.

 मंत्री नवाब मलिक हे सध्या दुबई दौर्‍यात आहेत. मलिक यांनी  परदेशातून हा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये मलिक यांनी कबूल है कबूल है कबूल है ये क्या किया तुने Sameer Dawood Wankhede? अशी कॅप्शन लिहीत फोटो पोस्ट केला आहे.

नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर टाकलेल्या फोटोबाँम्ब मुळे वानखेडेंची झोप उडणार आहे.आता वानखेडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. मलिक यांच्या फोटो बाँम्बची  सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.