Omicron Corona Variant New Guidelines | केंद्र सरकार ॲक्शन मोडवर : भारताने जाहीर केली धोकादायक देशांची यादी : परदेशी प्रवाश्यांसाठी नवे नियम लागू 

दिल्ली : Omicron Corona Variant New Guidelines । कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय.भारतात तातडीच्या उपाययोजना गतिमान झाल्या आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव रोखण्यासाठी भारतानं मोठं पाऊल उचललं आहे.भारताने 12 धोकादायक देशांची यादी जाहीर करत परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. (new rules apply for foreign travelers)

जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट रोखण्यासाठी भारतानं नवी नियमावली जाहीर केलीय. या नियमावली नुसार, परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांन 14 दिवसांच्या ट्रॅव्हेल हिस्ट्रीची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.याशिवाय, प्रवाशांना प्रवास करण्याआधीच एअर सुविधा पोर्टलवर त्यांचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपलोड करणे बंधनकारक असणार आहे.

केंद्राने जाहीर केली धोकादायक देशांची यादी

केंद्र सरकारनं 12 देशांची यादी जाहीर केलीय. ज्यांना अधिक धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आलंय. या यादीत यूकेसह युरोपियन युनियनचे सर्व देश दक्षिण अफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सावाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे.

परदेशी प्रवाशी भारतात आल्यावर

या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर, त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना चाचणी करावी लागेल. मात्र, त्यावेळीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर, त्याला पुढील सात दिवस स्वत: ला मॉनिटरिंग करावं लागेल.

तिघांच्या रिपोर्टवर भारताचे लक्ष

दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन जगभरात खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिके वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. यातच दक्षिण अफ्रिकेतून महाराष्ट्राच्या डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. या रूग्णांचे रिपोर्ट काय येतात यावरच भारतात ओमिक्रॉन चा शिरकाव झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर करत उपाययोजना हाती घेतल्या आहेत.