Omicron latest update | महाराष्ट्राच्या चिंता वाढल्या : दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेला प्रवासी निघाला कोरोना बाधित

मुंबई : Omicron latest update | दक्षिण आफ्रिकेसह जगभरातील 12 देशांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडालेली आहे.याचे पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत.

दक्षिण आफ्रिकेवरून (South Africa ) कर्नाटकात आलेले दोन प्रवासी या आधीच कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्यान भारताच्या चिंता वाढलेल्या असतानाच आता महाराष्ट्राच्या चिंता वाढल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेवरुन महाराष्ट्रात आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा प्रवासी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन (Cape Town) शहरातून डोंबिवलीत आला आहे. या प्रवाशाची आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोंबिवलीत आढळून आलेल्या या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

कर्नाटक व डोंबिवलीत आढळून आलेल्या रुग्णांचा रिपोर्ट काय येणार याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.