New Gold price Today : सोन्याच्या भावात घसरण सुरूच ; जाणून घ्या 21 सप्टेंबर 2021 रोजीचा दर

New Gold price Today Gold prices continue to fall

नवी दिल्ली : New Gold price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट (Decline in gold prices) सुरूच आहे. 21 सप्टेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली आहे तर चांदीच्या चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. (Rise in the price of silver)

मागील आठवड्याच्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते तर चांदी 58,710 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आज भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली, तर चांदीच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही.(Today, gold prices fell sharply in the international market, just like in the Indian bullion markets)

 

सोन्याचे नवीन भाव (New gold prices)

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत फक्त 10 रुपयांनी घट झाली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने आज 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आणि ती 1,761 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.(New Gold price Today)

चांदीचे नवीन भाव (New price of silver)

चांदीच्या भावातही आज किंचित वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे भाव फक्त 40 रुपयांनी वाढून 58,750 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही लक्षणीय बदल झाले नाहीत आणि ते 22.42 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

सोन्याचे भाव का घसरले? (Why did gold prices fall? )

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरू झालीय.अशा परिस्थितीत गुंतवणूकदार (Investors) बैठकीच्या निकालांची आणि फेड अधिकाऱ्यांच्या निवेदनाची वाट पाहतील.

त्याचवेळी, फॉरेक्स मार्केटमध्ये (Forex market) आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 15 पैशांच्या मजबुतीसह 73.59 च्या पातळीवर व्यवहार करत होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ -उतार सुरूच आहेत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली. (New Gold price Today)