Jamkhed Accident News Today : जामखेड तालुक्यात बोलेरो गाडी विहिरीत कोसळली, जांबवाडी येथील भीषण अपघातात 4 तरूणांचा मृत्यू !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Accident News Today : जामखेड तालुक्यातील जांबवाडी (Jamkhed jambwadi) भागात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या घटनेत भरधाव बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत कोसळली. या भीषण अपघातात जामखेड तालुक्यातील चौघा तरूणांचा जागीच मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यावर घडली. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed News Today)

याबाबत सविस्तर असे की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडी या ठिकाणी मातकुळी रोडने जामखेडच्या दिशेने येत असलेल्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या खडीमुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात या गाडीतील चौघांचा मृत्यु झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके वय 29, रामहरी गंगाधर शेळके वय 35, किशोर मोहन पवार वय 30 सर्व राहणार जांबवाडी व चक्रपाणी सुनिल बारस्कर वय 25, रा. राळेभात वस्ती जामखेड या चौघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. (Jamkhed News Live)

अशोक विठ्ठल शेळके वय 29, रामहरी गंगाधर शेळके वय 35, किशोर मोहन पवार वय 30 सर्व राहणार जांबवाडी व चक्रपाणी सुनिल बारस्कर वय 25, रा. राळेभात वस्ती जामखेड हे चौघेजण पवनचक्की कंपनीच्या MH 23 AU 8485 या बोलेरो गाडीतून मातकुळीहून जामखेडच्या दिशेने येत असतानाच त्यांच्या गाडीला जांबवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्यांची बोलेरो गाडी जांबवाडी शिवारातील गट नंबर 391 मधील नाथा काशिनाथ शिरगिरे व केदार रसाळ यांच्या सामाईक विहीरीत कोसळली. रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी विहिरीत कोसळली असा प्राथमिक अंदाज आहे. (Jamkhed Accident News Today)

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी यावेळी रस्त्याचे खडीकरणाचे काम करत असलेल्या मजुरांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने स्थानिकांनी दोरी व क्रेनच्या सहाय्याने विहीरीत उतरत गाडीतील तरूणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पाण्यात बुड्या घेऊन गाडीच्या काचा फोडून अपघातग्रस्त तरूणांना बाहेर काढण्यात आले. (Jamkhed Accident News Today)
Jamkhed Accident News Today
दरम्यान, अपघातग्रस्त चौघा तरूणांना जामखेड ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू दुर्दैवाने या चौघा तरूणांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.या घटनेतील मयत चक्रपाणी सुनिल बारस्कर हा तरूण पवनचक्की कंपनीच्या बोलेरो गाडीचा चालक होता. दरम्यान या घटनेतील चौघा मृतांचे ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अत्यंत शोकाकुल वातावरणात चौघा तरूणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Jamkhed Accident News Today)
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघात प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत. विहिरीत पडलेल्या बोलेरो गाडीला विहिरीतून बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. (Jamkhed Accident News Today)