Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच ; जाणून घ्या आजचे भाव

मुंबई  : Gold Silver Price Today 6 October 2021 सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील नफा वसुलीमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,500 कमी आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं.

एमसीक्सवर आजही सोन्याचांदीच्या किंमती (Gold-Silver Price Today) कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदीचा विचार (Buy gold at low cost) करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.35% नी कमी झाली आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) 0.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात, मजबूत डॉलर आणि अमेरिकेच्या उच्च ट्रेझरी यील्डच्या दबावामुळे आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहेत दर ? 

जागतिक बाजारपेठेत, मजबूत डॉलर आणि अमेरिकेच्या उच्च ट्रेझरी यील्डच्या दबावामुळे आज सोन्याच्या किमती कमी झाल्या. स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी घसरून 1,755.05 डॉलर प्रति औंस झाले आहे. डॉलर निर्देशांक 2021 च्या उच्चांकाजवळ होता. चांदीचे दरही आज 0.9 टक्क्यांनी घसरून 22.46 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

भारतातील आजचा सोन्याचा दर

सोन्याचांदीचे दर आज कमी झाले आहेत. सोन्याची वायदे किंमत (Gold price today on Multi commodity Exchange) 0.35% नी कमी होऊन 46,600 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर देखील (silver price) 0.6% टक्क्यांनी कमी होऊन 60,623 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कशी तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर 

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

सुचना : सोन्याचे भाव दुपारपर्यंतचे आहेत.