Jalgaon Railway Accident death : पुष्पक रेल्वे दुर्घटनेतील अनेक प्रवाश्यांचे शीर धडावेगळे तर अनेकांच्या शरीराच्या चिंधड्या, घटनास्थळावर मन हेलावून टाकणारं भयानक दृश्य, जळगाव रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Jalgaon Railway Accident death : बुधवारी जळगावमध्ये पुष्पक रेल्वेचा भीषण अपघात झालाय.आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी भीतीने धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने अनेकांना उडवलं.पुष्पक एक्स्प्रेसमधून (Pushpak Express Accident Jalgaon) जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारणाऱ्या काही प्रवाश्यांच्या शरीराच्या अक्षरशा: चिंधड्या उडाल्या. तर काही प्रवाश्यांचे शीर धडावेगळे झाले.मन हेलावून टाकणारं भयानक दृश्य घटनास्थळावर दिसत होते. घटनेची केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळी वेगाने मदतकार्य सुरु आहे. या दुर्दैवी घटनेत अत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (pushpak express accident news today)

जळगाव जवळच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Pardhade Railway Station) उत्तर प्रदेशच्या लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यानं अनेक प्रवाशांनी रेल्वेतून रुळांवर उडी मारली परंतू, दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसला धडकून अनेकांचा मृत्यू झाला आहे. (Jalgaon Railway accident news today)
रेल्वे थांबत असताना चाकातून ठिणग्या येताना दिसल्यानं एका डब्यातील काही प्रवाशांनी घाबरून डब्याला आग लागली असल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर घबराट पसरल्यानं डब्यातील अनेकांनी रुळावर उड्या मारण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी बाजूच्या रुळावरून कर्नाटक एक्सप्रेस वेगानं जात असल्यानं अनेक प्रवासी त्याखाली चिरडले गेले.
आतापर्यंत अंदाजे 16 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येत होती. परधारे गावाजवळ पोहोचली असता एका बोगीतून चाकाखालून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आग लागली अशी अफवा पसरली. त्यामुळे लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या. पण त्याचवेळी बंगळुरू एक्स्प्रेस सुसाट वेगात आली. त्यामुळे काही प्रवाशी हे रेल्वेखाली सापडले. त्यामुळे काही प्रवाशांचे शीर धडा वेगळे झाले. तर काही जणांचे दोन तुकडे झाले. काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे, पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ४ .२० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
जळगावच्या माहेजी जवळ पुष्पक एक्स्प्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस खाली सापडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
नेमकी कशी घडली दुर्घटना
लखनऊहून मुंबईकडे पुष्पक एक्स्प्रेस येत होती. कुणी तरी चेन खेचली. त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेस ही पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या परधारे गावाजवळ उभी होती. त्याचवेळी काही प्रवाशी हे रुळावर येऊन उभे होते. त्यावेळी विरुद्ध दिशेनं कर्नाटक एक्स्प्रेस आली होती. ही गाडी मुंबईहून बंगळुरूकडे चालली होती. कर्नाटक एक्स्प्रेस वेगात होती त्यामुळे तिने प्रवाशांना चिरडून पुढे निघून गेली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या. काही रेल्वे गाड्या या भुसावळ रेल्वे स्थानकावरून मदत पोहोचली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील धनराज नीला यांनी दिली.
जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबिंयाना पाच लाख रुपयांची मदत; तर जखमींवर मोफत उपचार
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.