- Advertisement -

Shocking Leopard found dead Incidents in Karjat taluka | धक्कादायक: बिबट्या मृतावस्थेत आढळून आला ; कर्जत तालुक्यातील घटना

कर्जत : Shocking Leopard found dead Incidents in Karjat taluka कोरेगाव ता कर्जत येथे चार वर्ष वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोरेगाव येथील रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात विशाल परदेशी या युवकाला प्रथमदर्शनी मृत बिबट्या दिसला. त्याने तात्काळ कर्जत वनविभागाशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली.

सोमवार, दि २२ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास कोरेगाव ता.कर्जत येथील रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात चार वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला.

विशाल परदेशी या युवकाने तात्काळ कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना खबर दिली. शेळके यांनी वनविभागाचे कर्मचारी यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. जवळपास दोन-तीन दिवसापूर्वीच सदर बिबट्याचा नैसर्गीक मृत्यु झाला असल्याचे सांगितले.

घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात येईल अशी माहिती मोहन शेळके यांनी पत्रकारांना दिली. डोंबाळवाडी आणि कोरेगाव शिवारात बिबट्याच्या दर्शनाने परिसरात मोठी भीती निर्माण झाली होती. परंतू सोमवारी कोरेगाव भागात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने काही प्रमाणात भीती कमी झाली आहे.