- Advertisement -

Rural Development Minister Hasan Mushrif | पालकमंत्री शनिवारी जामखेड तालुका दौऱ्यावर

पालकमंत्री प्रथमच जामखेडच्या दौर्‍यावर

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे शनिवारी दि १४ ऑगस्ट रोजी जामखेड तालुका दौर्‍यावर येणार आहेत. Guardian Minister Hasan Mushrif on a visit to Jamkhed on Saturday

Rural Development Minister Hasan Mushrif | पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जामखेडमधील दौर्‍याची सुरूवात जामखेड तालुक्यातील खर्डा येथून होणार आहे.त्याआधी ते कर्जत तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तेथील कार्यक्रम संपवून ते सकाळी ११: ३० वाजता खर्डा येथे येणार आहेत.

खर्डा उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या (Maharashtra State Warehousing Corporation) नविन गोदाम उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांच्या हस्ते तर आमदार रोहित पवार ( MLA ROHIT PAWAR) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.त्यानंतर आरोळे हाॅस्पीटलमधील (Aarole Hospital Jamkhed) कॅथलॅबचे उद्घाटन व ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट व ऑक्सिजन बेडच्या लोकार्पण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

यानंतर दुपारी दीड नंतर जामखेड शहरातील राज लाॅन्स या ठिकाणी कर्जत – जामखेड मतदारसंघातील कोरोना सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना तसेच लसीकरण याबाबत आढावा व पत्रकार परिषद पार पडणार आहे. दुपारी अडीच वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif ) हे पाथर्डीकडे रवाना होतील असा शासकीय कार्यक्रम आहे. याव्यतिरिक्त पालकमंत्री अन्य कार्यक्रमांनाही हजेरी लावतील अशी शक्यता आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif ) हे प्रथमच जामखेड तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत.या दौर्‍यात मुश्रीफ हे आणखीन काही नवीन घोषणा करणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आमदार रोहित पवार यांच्या गटाकडून सुरू आहे.