रत्नदीप चे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्या गाडीला अपघात, मोरे कुटुंबिय थोडक्यात बचावले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्या गाडीला भीषण अपघात होण्याची घटना घडली. सुदैवाने मोरे कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले.

Ratnadeep president Dr. Bhaskar More's car met with an accident, More's family narrowly escaped

रत्नदीपचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे आपल्या कुटुंबासह पुण्याहून जामखेडला परतत होते. स्वता:च्या मर्सिडीज गाडीने जामखेडला परतत होते. अहमदनगर जवळील चास शिवारात मोरे यांच्या गाडीला अपघात झाला.

ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला गाडी धडकली. या अपघातात गाडीच्या उजव्या बाजुचे दोन्ही मॅकव्हील आणि टायर फुटले.गाडीतील सुरक्षिततेच्या उपायांमुळे मोरे कुटुंब बचावले.

कोणालाही इजा झाली नाही. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात काल रात्री अहमदनगर- पुणे महामार्गावर घडला. भास्कर मोरे व सर्व कुटुंबिय सुखरूप आहेत.