माजी सरपंच प्रदीप दळवी उतरणार जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दळवी कुटुंब पक्षात सक्रीय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। यंदा जवळा जिल्हा परिषद गटात काट्याची टक्कर होणार आहे.जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप दळवी यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात एकनिष्ठ म्हणून कार्यरत असलेल्या दळवी कुटुंबातील प्रदीप दळवी हे जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, त्यादृष्टीने त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात जवळा गावाची सातत्याने महत्वपूर्ण भूमिका असते. जवळा जिल्हा परिषद गटातील जवळा हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. या गावच्या स्थानिक राजकारणात प्रदीप दळवी यांचे वडील स्व किसनराव (मामा) दळवी यांची कायम निर्णायक भूमिका राहत आलेली आहे. ग्रामपंचायतवर अनेक वर्षे त्यांच्या गटाकडे सत्ता राहिली आहे. दळवी कुटूंबांने आपला राजकीय प्रवास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रती निष्ठा ठेवून आजवर केलेला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करताच स्व. किसनराव दळवी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन पक्षाचे कार्य हाती घेतले होते. त्यानंतर दळवी यांचे चिरंजीव प्रदीप दळवी हे वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीत सक्रीय झाले. त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा संघटक म्हणून पक्षात काम केले आहे.

प्रदीप दळवी हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून तालुक्याच्या राजकारणात ओळखले जातात. 2002 आणि 2007 या दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने दळवी कुटुंबाला जवळा गणातून उमेदवारी दिली होती. त्यानंतरच्या 2012 च्या निवडणुकीत प्रदीप दळवी यांची उमेदवारी निश्चित होती परंतू त्या निवडणुकीत स्वता: प्रदीप दळवी यांनी मित्राला उमेदवारी मिळावी यासाठी त्याग केला होता.दळवी कुटुंब राष्ट्रवादीत कायम सक्रीय राहत आले आहे.

यंदा होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीत जवळा गटातून निवडणुक लढवण्यासाठी प्रदीप दळवी हे इच्छुक आहेत, त्यांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. 1968 पासून दळवी कुटुंब जनसेवेत सक्रीय आहे.1992 ते 1997 या काळात प्रदीप दळवी यांचे वडील स्व किसनराव दळवी हे काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य होते.

प्रदीप दळवी यांच्याकडे मोठा राजकीय वारसा आहे. सर्वच घटकात दळवी यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे प्रदीप दळवी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात सक्रीय असलेल्या दळवी कुटुंबाला राजकीय बळ दिले जावे अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.

दळवी कुटुंबांचा आजवरचा राजकीय प्रवास

1968 सालापासून किसनराव दळवी हे कायम गावकारभारी म्हणून जवळ्याच्या राजकारणात आणि सामाजिक सेवेत सक्रीय होते, त्यांना परिसरात बागायतदार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरवात काँग्रेस पक्षाकडून केली. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख होती.

स्व किसनराव दळवी यांनी 1980 च्या दशकात शरद पवार हे दिघी येथे आले असता त्यांना पहिल्यांदा जवळा गावात आणून पवार यांची गावातून भव्य मिरवणूक काढली होती.

1989 ते 1994 या काळात स्व किसनराव दळवी यांनी जवळा गावचे सरपंचपद भूषवले

1992 ते 1997 या काळात स्व किसनराव दळवी हे  पंचायत समिती सदस्य होते

1997 ते 2002 या काळात स्व किसनराव दळवी यांनी आपले मित्र डाॅ गोविंद रासने यांना उमेदवारी मिळवून देत त्यांचा विजय घडवून आणला आणि गणावर असलेले आपले प्रभुत्व सिध्द केले.

स्व किसनराव दळवी यांनी रयतच्या उत्तर विभागीय सल्लागार बाॅडी सदस्य आणि संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष म्हणून सुध्दा काम केले होते.

2002 च्या पंचायत निवडणुकीत किसनराव दळवी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवली होती.

2007 च्या पंचायत समिती निवडणुकीत सुशीला किसनराव दळवी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवली होती.

2008 ते 2013 या कालावधीत सुशीला किसनराव दळवी यांनी जवळा गावचे सरपंचपद भूषवले, या काळात ग्रामपंचायतीचा कारभार प्रदीप दळवी यांनी सांभाळला होता. या काळात प्रदीप दळवी यांनी अजितदादा पवार यांच्या माध्यमांतून 2009 साली 35 लाख रुपये खर्चाची जवळा येथील अंतर्गत पाणी पुरवठा योजनेस तत्वता : मान्यता घेऊन त्यानंतर 2012 ला ही योजना यशस्वी केली. माॅडेल स्कूल योजनेतून 16 लाखाचा निधी मिळवून आणला व तीन वस्ती शाळांसाठी 21 लाखांचा निधी मंजूर करून आणत शाळा पुर्ण करून घेतल्या. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून जवळा गावचे आराध्य दैवत श्री जवळेश्वर मंदिराचा ‘क’ दर्जा मिळवला. यासाठी तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी मदत केली.

2013 ते 2018 या काळात स्वता: प्रदीप दळवी यांनी जवळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले.

राष्ट्रवादी युवक जिल्हा संघटक म्हणून प्रदीप दळवी यांनी पक्षात काम केले आहे.