ब्रेकिंग : माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यात तुफान राडा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडली

पुण्यातील कात्रज परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून शिवसेेनेच्या कार्यकर्त्यांनी सामंतांच्या ताफ्यावर हल्ला चढविल्यानंतर पोलिसांनी वेळीच मध्यस्ती केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सामंत यांचा ताफा सुरक्षितपणे पुढे काढून दिला. या गदारोळात परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंत हे सुखरुप आहेत. या हल्ल्यातून ते बचावले आहेत. सामंत यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. सामंत यांचा मोठा ताफा त्यांच्यासोबत होता. केंद्राच्या सुरक्षेच्या तीन गाड्या त्यांच्यासोबत होत्या. तसेच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅन त्यांच्यासोबत होत्या.

मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली असल्याने या परिसरात प्रचंड ट्राफीक जाम झाली होती. त्याचवेळी सामंत यांचा ताफा वेगाने जाण्याच्या तयारीत होता.पण या ताफ्याला जाता आलं नाही. यावेळी काही शिवसैनिकांची नजर सामंत यांच्या दिशेला गेली. गाडीत सामंत आहेत याची जाणीव झाली आणि ते त्यांच्या दिशेला धावले. नंतर सगळा गदारोळ झाला.या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला.

Breaking,Shiv Sainiks attacked former minister Uday Samant's car in Pune
पुणे – उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला,कोथरूड पोलीस ठाण्यात आणण्यात आलेली गाडी.

शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचे थरारक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान घटनेच्या वेळी परिसरात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

उदय सामंत हे महंमदवाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराजवळ आले होते. यावेळी चौकाजवळ संबंधित घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं आणि त्यानंतर हल्लाबोल केला. सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.