National Voters’ Day 2022 | जामखेडमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन : कोण ठरले विजेते ? उत्कृष्ट BLO कोण ? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | National Voters’ Day 2022 | लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार जनजागृती मोहीम राबवली जाते ती समजावून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व खूप मोठे आहे असे प्रतिपादन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात तहसीलदार योगेश चंद्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत होशिंग हे होते.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यात BLO म्हणून काम करणाऱ्या पाच उत्कृष्ट बीएलओंचा सन्मान करण्यात आला.

निबंध स्पर्धा विजेते ( 5 वी ते 7 वी)

 1. कृष्णा संतोष फंदाडे,
 2. स्नेहल शिवाजी बनगे,
 3. समृध्दी संतोष गिरी,

निबंध स्पर्धा विजेते ( 8 वी ते 10 वी )

 1. दर्शन निलेश भोसले,
 2. अनघा वैभव कुलकर्णी,
 3. संभाजी नितीन भोसले

चित्रकला स्पर्धा विजेते  ( 5 वी ते 7 वी )

 1. रूद्र जगदीश मेनकुदळे,
 2. आकांक्षा बाबासाहेब धनवडे,
 3. श्रावणी विजय क्षीरसागर

चित्रकला स्पर्धा विजेते ( 8 वी ते 10 वी)

 1. सिध्दी जगदीश मेनकुदळे,
 2. सुमेधा शिरीषकुमार कदम,
 3. सिध्दी अर्जुन रासकर

घोषवाक्य स्पर्धा विजेते ( 5 वी ते 7 वी )

 1. समृद्धी संतोष गिरी,
 2. सई योगेश पठाडे,
 3. स्नेहल शिवाजी बनगे

घोषवाक्य स्पर्धा विजेते ( 8 वी ते 10 वी)

 1. सारंग शरद शिरसाठ,
 2. सायली विजय राजकर,
 3. आकांक्षा सिध्देश्वर पवार,
 4. वैष्णवी नरेंद्र डहाळे

उत्कृष्ट BLO

 1. सागर सुनिल माकुडे (यादी भाग क्रमांक 96 जामखेड)
 2. विजयकुमार बबनराव चौधरी (यादी भाग क्रमांक  228 हाळगाव)
 3. फिरोजखान दुलेखान (यादी भाग क्रमांक  95 जामखेड)
 4. शबाना बादशाह शेख (यादी भाग क्रमांक  99 जामखेड)
 5. शितल भगवान कदम (यादी भाग क्रमांक 98 जामखेड)

यावेळी सचिन आगे, निलेश आडाले, पर्यवेक्षक रमेश अडसूळ व योगशिक्षक बाळासाहेब पारखे,शहाजी वायकर, प्रवीण, रामचंद्र होशिंग व ईश्वर कोळी, मुकुंद राऊत, अनिल देडे, संजय कदम,विशाल पोले,अविनाश नवगिरे,श्रीमती दराडे मॅडम, हांगे मॅडम,घायतडक मॅडम,भालेराव मॅडम,अल्हाट मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे व आभार  उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.