जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे स्वातंत्र्यदिनी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मिरजगाव जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात महाश्रमदान व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मिरजगाव शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सरपंच -उपसरपंच तसेच सर्व राजकीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी महाश्रमदानात विशेष सहभाग घेतला होता.
शहरात सामाजिक संघटनांच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तर अनेक ठिकाणी विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

सामाजिक संघटनेच्या या उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या महाश्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी श्रमप्रेमींनी स्वच्छ, सुंदर व हरित मिरजगाव परिसर करण्याचा संकल्प केला आहे