Kolhapur North Assembly By-Election 2022 । करूणा मुंडेंची मोठी घोषणा, ‘या’ विधानसभा मतदारसंघातून ‘मुंडे’ नशिब आजमावणार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Kolhapur North Assembly By-Election 2022 । कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहिर झाली असून या निवडणुकीत भाजप विरूध्द महाविकास आघाडी हा सामना रंगणार आहे. परंतू या लढाईत करूणा मुंडे यांच्या शिवशक्ती सेना पक्षाने उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. Kolhapur North Assembly By-Election 2022

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर या मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. दिवंगत आमदार जाधव हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान आहे तर 16 एप्रिल रोजी निकाल घोषित होणार आहे. (Kolhapur North Assembly By-Election 2022)

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची राळ उठवून प्रकाशझोतात आलेल्या करूणा मुंडेंनी काही महिन्यांपूर्वी शिवशक्ती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. होळीच्या मुहूर्तावर या पक्षाने आपली राज्यातील पहिली शाखा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्यात उघडली आहे.

करूणा मुंडे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आपली पहिली विधानसभा निवडणुक कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून लढवणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरात करूणा मुंडे आणि त्यांच्या पक्षाची चर्चा रंगली आहे. (Kolhapur North Assembly By-Election 2022)