स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांना प्रथमोपचार किटचे वाटप; नायगावात संध्या सोनवणे यांचा अनोखा उपक्रम

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांनी जामखेड तालुक्यातील नायगावमध्ये अनोखा उपक्रम राबवत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

जामखेड तालुक्यातील नायगावमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हर घर झेंडा मोहिमेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.15 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि पंचक्रोशी रयत शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यावतीने नायगावमधील सर्व शाळांसाठी प्राथमिक प्रथमोपचार पेट्या भेट दिल्या. (Distribution of first aid kits to schools on occasion of Amrit Mahotsav of Independence; Sandhya Sonawane’s unique initiative in Naigaon)

संध्या सोनवणे ह्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय असलेल्या युवा कार्यकर्त्या आहेत. नेहमी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त नायगावमधील शाळांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करून त्यांनी अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतूक केले.

यावेळी सरपंच सुवर्णा उगले, उपसरपंच भाग्यश्री उगले
ग्रामसेवक नंदा डामसे, तलाठी अनुराधा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अशोक लेंडे, आश्रू उगले ,चंद्रकांत उगले, बाबासाहेब उगले, विनोद उगले, भीमराव लेंडे,नंदू उगले, भारत उगले, युवराज उगले,गणेश उगले तसेच केशव कोल्हे सर, साळवी सर, मडके सर, लव्हाळे सर आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.