अजित पवारांविरोधात अश्लील व शिवीगाळ पोस्ट करणाऱ्या 15 जणांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अश्लील व शिवीगाळ पोस्ट करणार्या 15 लोकांविरोधात विविध कलमान्वये बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नितीन यादव यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.

सतिश वर्तक, विश्वजीत इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे, विनोद पवार, विजय भोगे, रजनीकांत राठोड, सचिन भैय्या तिपाले पाटील, शंतनू गायवट, प्रसमा निजामपूरकर, ओंकार देवरगावकर, आशुतोष भितुडे, हरिष शेटे, कुणाल महाडिक, गणेश चोरमारे,अभिजित देशमुख या फेसबुक अकाऊंटवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील व शिवीगाळ करणाऱ्या कमेंट व पोस्ट केल्याप्रकरणी नितीन यादव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात 15 जणांविरोधात कलम 294, 500, 501, 504,505, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहेत. (Crimes filed against 15 persons for posting obscene and abusive words against Deputy Chief Minister Ajit Pawar)