अहमदनगर अग्नीतांडव : पोलिसांनी दाखल केला गुन्हा ;  मुंबईची चौकशी समिती जिल्हा रुग्णालयात दाखल 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीबाबत (Ahmednagar District Hospital Fire) पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पोलिस विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात शनिवारी घडलेल्या अग्नीतांडवाच्या घटनेत प्रकरणी सरकारने आठ सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. नाशिक विभागीय आयुक्तांची समिती सदर प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात भादंवि कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक (Police inspector) किंवा पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल असेही दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान नाशिक विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली नेमण्यात आलेल्या आठ सदस्यीय चौकशी समिती अहमदनगरला दाखल होण्याआधीच मुंबईतून तीन अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती अहमदनगरला दाखल झाली आहे. या समितीकडून प्राथमिक चौकशी केली जात आहे. या समितीत डाॅ प्रदीपकुमार व्यास, डाॅ अर्चना पाटील, डाॅ सतिश पवार यांचा समावेश आहे. या समितीकडून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.(Mumbai inquiry committee admitted to Ahmednagar district hospital)

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे आज  जिल्हा रुग्णालयास भेट देणार आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे याही भेट देणार आहेत. त्यांनंतर दोन्ही नेते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.