- Advertisement -

ahmednagar lockdown news today | अहमदनगर जिल्ह्यातील 08 गावांमध्ये लाॅकडाऊन घोषित : जिल्ह्यातील लाॅकडाऊन घोषित गावांची संख्या झाली 69

ahmednagar lockdown news today : जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील 04 तालुक्यातील 08 गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन घोषित केला आहे. आत्ता जिल्ह्यातील लाॅकडाऊन घोषित गावांची संख्या 69 झाली आहे.( Lockdown declared in 08 villages of Ahmednagar district: The number of villages declared lockdown in the district was 69 )

जामखेड तालुक्यातील नागरिकांनो आता सावध होण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याची वाटचाल संपूर्ण लाॅकडाऊनच्या दिशेने होऊ लागल्याने जिल्हावासियांच्या चिंता आता वाढल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावांमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता आणखीन 08 नवीन गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आज लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

ज्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. तिथे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. लग्न समारंभावरही बंदी घालण्यात आली आहे.

आज प्रशासनाने खालील 08 गावांमध्ये लाॅकडाऊन जाहिर केला आहे. येथे 05 ऑक्टोबर पासुन 14 ऑक्टोबर पर्यंत लाॅकडाऊन असणार आहे.

1) नेवासा – चांदा

2)  पारनेर – निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी

3) संगमनेर – राजापूर, प्रिंपरी लौकी, आजमपुर

शेवगाव  –  वडले बुद्रुक

रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील खालील 61 गावांमध्ये लाॅकडाऊन जाहीर झालेला आहे.

1) अकोले – लिंगदेव, विरगाव, परखतपूर

2) कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला

3) नेवासा – कुकाणा

4) कोपरगाव – गोधेगाव

5) पारनेर – वडनेर बु. कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी

6) पाथर्डी – तिसगाव

7) राहता – भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, को-हाळे, लोणी बु., लोणी खु, कोल्हार बु.

8) संगमनेर – गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापूरी, कनोली, निर्माण, वडगाव पान, सायखींडी

9) शेवगाव – भातकुडगाव, घोटण, दहीगावने, आव्हाणे बु.

10) श्रीगोंदा – लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी

11) श्रीरामपूर – बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव

 

web titel : ahmednagar lockdown news today | Lockdown declared in 08 villages of Ahmednagar district The number of villages declared lockdown in the district was 69