- Advertisement -

“या” मागणीसाठी खर्डा ग्रामपंचायत झाली आक्रमक : दिला रास्ता रोकोचा इशारा! (Kharda Gram Panchayat became aggressive for “this” demand.)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda) शहरातून जाणार्या शिर्डी- हैद्राबाद महामार्गाची (Shirdi – Hyderabad Haiway) खर्डा शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी यासाठी खर्डा ग्रामपंचायतीच्या ( Kharda Gram panchayat) वतीने जामखेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. सदर रस्ता तातडीने दुरूस्त न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच नमिता असाराम गोपाळघरे, उपसरपंच रंजना श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे, महालिंग कोरे सह आदींच्या सह्या आहेत. (Kharda Gram Panchayat became aggressive for “this” demand.)