राज्याच्या चिंता वाढल्या | कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ तसेच ओमिक्रॉनचा विस्फोट सुरूच ! 5,368 new coronavirus patients were found in maharashtra today
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि,30 डिसेंबर 2021 | राज्याची चिंता वाढवणारी बातमी गुरूवारी समोर आली आहे. आज ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट झाला. आजवरची सर्वात मोठी 198 ओमिक्रॉन रूग्ण संख्या आज राज्यात आढळून आली आहे. तसेच नियमित कोरोनाबाधितांच्याही संख्येतही मोठी वाढ झाली आहे. राज्यात 5,368 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (5,368 new coronavirus patients were found in maharashtra today)
राज्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे.मंगळवारच्या रूग्ण संख्येपेक्षा बुधवारची रूग्णवाढ दुप्पट होती. गुरूवारी राज्याने गेल्या काही महिन्यात पहिल्यांदा पाच हजार रूग्ण संख्येचा आकडा पार केल्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं आहे.
राज्यात गुरूवारी दिवसभरात एकुण 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर 1 हजार 193 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 22 कोरोनाबाधित रूग्णाचा आज राज्यात मृत्यू झाला आहे.
आज अखेर राज्यात 65 लाख 07 हजार 330 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचं रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के इतके आहे. राज्यात आज अखेर 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमिक्रॉनचा विस्फोट सुरूच
राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे.राज्यात गुरूवारी ओमिक्रॉनचा अक्षरशा: विस्फोट झाला आहे. राज्यात एकाच दिवसातली सर्वोच्च रूग्ण संख्या नोंदवली गेली. तब्बल 198 ओमिक्रॉन रूग्ण गुरूवारी राज्यात आढळून आले आहेत.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात तर 198 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 30 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. आज आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये सर्वाधिक 190 रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ठाणे मनपा 04, सातारा 01, नांदेड 01, पुणे मनपा 01, पिंपरी-चिंचवड 01 या नव्या रूग्णांचा समावेश आहे.
ओमिक्रॉन मृत्यूची नोंद ?
राज्यात आज एका ओमिक्रॉन रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नायजेरियाहून प्रवासाचा इतिहास असलेल्या 52 वर्षाच्या पुरुषाचे 28 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या रूग्णास मागील 13 वर्षांपासून मधुमेहाचा त्रस्त होता. या रूग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणानी ( नाॅन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या अहवालात या रूग्णास ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या किती ?
राज्यात बुधवार अखेर 252 ओमिक्रॉन रूग्ण होते. गुरूवारी त्यात 198 रूग्णांची भर पडली. त्यानुसार राज्यात आजअखेर 450 कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. यातील 125 रूग्णांच्या RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आलेले आहे.
राज्यात आज अखेर आढळलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे
मुंबई 327 पिंपरी-चिंचवड 26, पुणे ग्रामीण 18, पुणे मनपा 12, ठाणे मनपा 12, नवी मुंबई 07, पनवेल 07, कल्याण डोंबिवली 07, नागपुर 06, सातारा 06, उस्मानाबाद 05, वसई विरार 03, औरंगाबाद 02, नांदेड 03, बुलढाणा 02, भिवंडी-निजामपूर मनपा 02, लातूर 01,अहमदनगर 01, अकोला 01, मिरा भाईंदर 01, कोल्हापूर 01 असे 450 ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. यात 09 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
राज्यात सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या किती ?
राज्यात गुरूवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 18 हजार 217 इतकी आहे. सर्वाधिक 11 हजार 360 सक्रीय रूग्ण मुंबईमध्ये आहेत. सर्वात कमी रूग्ण धुळे 4 रूग्ण नंदुरबार 4 रूग्ण, जळगाव 9 रूग्ण , हिंगोली 01 रूग्ण,
वाशिम 01 रूग्ण, वर्धा 04 रूग्ण, भंडारा 01 रूग्ण, चंद्रपुर 07 रूग्ण , गडचिरोलीत 08 रूग्ण आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात सक्रीय रूग्ण किती ?
अहमदनगर जिल्ह्यात गुरूवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 361 इतकी आहे.