धक्कादायक खुलासा! Siya Goyal अन् Chetan Chaudhari चालवत होते ‘फ्री सेक्स ग्रुप’; ‘ते’ पाहून तपास अधिकारीही हादरले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यातील केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्याकांडात आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (SiyaGoyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) हे केवळ गुन्हेगारी भागीदार नव्हते, तर पुण्यात चक्क एका ‘फ्री सेक्स ग्रुप’चे (Free sex Group) संचालन करत होते. आरोपींच्या पबमधील धिंगाण्याचे व्हिडिओ आणि हॉटेल्सचे आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

वडगाव कोर्टाने दोघांच्या कोठडीत (MCR) आता 29 जुलैपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, पोलिस तपासात केवळ हत्येचा भीषण कटच नाही, तर या आरोपींच्या अत्यंत वादग्रस्त, हाय-प्रोफाइल आणि विकृत जीवनशैली समोर आली आहे, ज्याने तपास अधिकारी अक्षरशः हादरले आहेत.
केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतनने अतिशय थंड डोक्याने नियोजन केले होते. स्वतःच्या हाताने गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला हत्येची ‘सुपारी’ देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, ज्या व्यक्तीला ही सुपारी दिली जात होती, त्याला जेव्हा शिकार होणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच केतन अग्रवालची खरी ओळख पटली, तेव्हा त्याने कायदेशीर कारवाईच्या भीतीने या गुन्ह्यात सहभागी होण्यास ऐनवेळी स्पष्ट नकार दिला. हा प्लॅन फसला नसता, तर केतनची हत्या आधीच कॉन्ट्रॅक्ट किलिंगद्वारे झाली असती, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
या प्रकरणातील सर्वात खळबळजनक खुलासा झाला आहे. तो म्हणजे, आरोपी सिया आणि चेतन हे केवळ मित्र किंवा गुन्हेगारी भागीदार नव्हते, तर ते दोघे मिळून एका ‘फ्री सेक्स ग्रुप’चे (Free Sex Group) संचालन करत होते. या ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील तरुण-तरुणींना जाळ्यात ओढले जात होते का, याचा तपास आता पोलिस करत आहेत. या ग्रुपशी संबंधित अनेक आक्षेपार्ह चॅट्स, तांत्रिक डेटा आणि पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी पुण्यातील काही नामांकित हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या फुटेजमधील दृश्यांनी पोलिसांनाही चक्रावून गेले आहेत. फुटेजमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी एकत्र एका हॉटेलच्या रूममध्ये जाताना दिसत आहेत. मात्र, सिया तिथून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच, त्याच हॉटेलच्या त्याच रूममध्ये चेतन चौधरी एका दुसऱ्याच अनोळखी तरुणीसोबत आत जाताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एक हॉटेलची रुम… चेतन-सियासोबत अजून 3 ते 4 तरुण-तरुणी…आणि रात्री दारु पिऊन एकमेकांशी प्रस्थापित केलेले शरीरसंबंध… मात्र, केतन हत्याकांडात पोलिस चौकशीत जे जे समोर येतंय, त्यानं समाज कुठल्या दिशेने चाललंय हा प्रश्न उभा राहत आहे. 20 वर्षांची सिया आणि 23 वर्षांचा चेतन असा एक सेक्स ग्रुपशी जोडलेले होते, ज्यात असे कांड होत होतं. जे कुठल्याही पाश्चात्य संस्कृतीलाही मागे टाकतील. आधी चेतनचे अनेक मुलींशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. नंतर सियाही अनेक मुलांसोबत बोलत होती, हे कळतंय…आणि त्यानंतर आता चेतन-सियाचं ओपन रिलेशनशीप समोर आलं आहे.
मुख्य आरोपी सिया गोयल हिची गुन्हेगारी वृत्ती आणि तिचे वर्तन समजून घेण्यासाठी पोलिसांनी तिचे सोशल मीडिया आणि मित्रमंडळींची चौकशी केली. यादरम्यान पोलिसांच्या हाती तिचे पुण्यातील काही हाय-प्रोफाइल पबमधील व्हिडिओ लागले आहेत. या व्हिडिओंमध्ये सिया दारूच्या नशेत तुडुंब होऊन प्रचंड धिंगाणा घालताना आणि इतर ग्राहकांशी वाद घालताना स्पष्ट दिसत आहे. तिच्या या अशा बेशर्म वर्तनामुळे परिसरात ती आधीपासूनच वादग्रस्त ठरली होती.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, सुपारी देण्याचा प्रयत्न केलेली ‘ती’ तिसरी व्यक्ती आणि फ्री सेक्स ग्रुपच्या माध्यमातून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का?, या बाजूने पोलिस आता कसून तपास करत आहेत. या 29 जुलैपर्यंतच्या कोठडीत पोलिस कोर्टात आणखी कोणते भक्कम पुरावे सादर करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.