Ketan Agrawal Murder Case: केतनशी लग्न का करायचं नव्हतं? चार दिवसानंतर Siya Goyal ने उघडलं तोंड, सांगितलं धक्कादायक कारण !
Ketan Agrawal Murder Case: संपुर्ण देशाला हादरवणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयलने आपल्या प्रियकराच्या मदतीने हे क्रुर हत्याकांड केल्याचं स्पष्ट झालं आहे. केतनच्या हत्येचे आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी होत असून नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या तपासात सियाने केतनच्या दोन गोष्टी तिला खटकत असल्याचा मोठा खुलासा केला आहे.
केतन अगरवालला टक्कल होते, त्यामुळे तो केसांचा विग घालत होता, ही बाब समजल्याने आपली लग्न करण्याची इच्छा उरली नव्हती, असा दावा सिया गोयल हिने पोलीस चौकशीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच लग्न मोडल्यास होणाऱ्या कौटुंबिक बदनामीच्या भीतीने थेट हत्येचा कट रचल्याची धक्कादायक कबुली सियाने तपासादरम्यान दिली आहे.
तसेच तपासादरम्यान पोलीस सूत्रांकडून असाही दावा केला जात आहे की, सियाला केतनच्या काही वैयक्तिक सवयी किंवा बाबी पसंत नव्हत्या, ज्यावरून त्यांच्यात खटके उडत होते. सियाला केतन (Ketan Agrawal) हा मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. त्यातील एक म्हणजे “केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. याशिवाय, दुसरी एक उणीव म्हणजे केतन बोलताना अडखळायचा.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सियाने केतनबद्दल वैयक्तिक नाराजी व्यक्त केली. “केतन तोतरे बोलत होता आणि तो विग (हेअर पॅच) वापरत असल्यामुळे मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते,” असे तिने सांगितल्याचे वृत्त आहे. (Siya Goyal)
केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केतन अग्रवालच्या हप्तेचा तपास आणि खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
“काही मेडिकल कारणांमुळे केतनला केसांचा छोटासा पॅच होता, मात्र हे सिया आणि तिच्या कुटुंबाला माहिती होते. याबाबत लग्न ठरवण्याच्या अगोदर क्लिअर सांगितलं होते, असं विशाल अग्रवाल म्हणाले. तसेच तिला मान्य नव्हतं तर नकार देणे तिच्यासाठी सोपे होते, यासाठी हत्या करण्याचे काहीच कारण नव्हते. माझ्या मुलाला मारण्याचे कारण काय?” असा संपत्त सवाल त्यांनी केला.
त्याचबरोबर “चेतन आणि सियाचा भाऊ साहिल हे दोघे मित्र आहेत, त्यामुळे त्यालाही त्यांच्या अफेयरबाबत माहिती असावी. तसेच केतनच्या हत्येच्या प्लॅनिंगमध्ये आणखी लोक सहभागी असतील, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, ही केस फास्टट्रॅकमध्ये चालवावी तसेच लवकरात लवकर जे सत्य आहे ते बाहेर यावे तसेच जे आरोपी आहे त्याला आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे तसेच मी स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.
याशिवाय, सियाने पोलिसांना दिलेल्या कथित जबाबात प्रियकर चेतन चौधरी यानेच तिला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही दावा केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांकडून सर्व पुरावे तपासले जात आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. (Siya Goyal)