- Advertisement -

धक्कादायक :डाॅक्टरने स्वता: आत्महत्या करत संपवले संपुर्ण कुटूंब; अहमदनगर जिल्हा हादरला! (Shocking: Doctor Mahendra Thorath commits suicide, kills entire family)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिध्द वैद्यकिय व्यवसायिक डॉक्टर महेंद्र थोरात (वय 46) (doctor Mahendra thorath Rashin ) यांनी स्वता:सह पत्नी व दोन मुलांची जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. (Shocking: Doctor Mahendra Thorath commits suicide, kills entire family; Ahmednagar district shaken)

आत्महत्येपूर्वी डाॅ महेंद्र थोरात यांनी दरवाजाला चिठ्ठी चिटकवली होती या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा कृष्णा ( वय 18) याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही  कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून  दुख: सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा  (वय 39) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. डाॅ थोरात यांचा धाकटा मुलगा कैवल्य हा आठ वषार्चा होता.तोही या घटनेत मयत झाला आहे. (Shocking: Doctor Mahendra Thorath commits suicide, kills entire family; Ahmednagar district shaken)

डाॅ महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. घटनेची माहिती समजताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी आत्महत्या कि घातपात? याचा उलगडा पोलिस तपासातच समोर येईल. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत वेगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान उच्चशिक्षित डाॅक्टरने संपुर्ण कुटूंबच संपवण्याची घटना घडल्याने संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  (Shocking: Doctor Mahendra Thorath commits suicide, kills entire family; Ahmednagar district shaken)