Sameer Wankhede Letest News | समीर वानखेडे जन्माने मुसलमान ? : उद्या होणार दूध का दूध पाणी का पाणी, संपुर्ण देशाचे लागले लक्ष
मुंबई : Sameer Wankhede Letest News | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा मुंबई महापालिकेने (BMC) केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Sameer Wankhede born Muslim? Decision to be taken tomorrow, attention of entire country)
मुंबई महापालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल शंका उपस्थित केली होती. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी वानखेडेंचे जात प्रमाणपत्रं आणि निकाहनाम्याची कॉपीही दिली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं
या संदर्भात हायकोर्टाने महापालिकेकडून वानखेडेंबाबतची कागदपत्रे मागवली होती. वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे.
वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. महापालिकेने कोर्टात कागदपत्रं सादर केल्याने उद्या कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनाही ही कागदपत्र दिली जाणार आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नवाब मलिक विरूध्द समीर वानखेडे या वादातील महत्वाच्या प्रकरणाचा उद्या मुंबई हायकोर्टात सोक्षमोक्ष लागणार आहे. समीर वानखेडे मुस्लिम आहेत ? यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याने याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.